इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा आतापर्यंतचा प्रवास व्यवस्थित गेलाय. त्यांनी आयपीएलच्या १५व्या हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला. अशात त्यांच्यासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. दिल्लीचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किया आता आयपीएल २०२२मध्ये मैदानावर उतरण्यास सज्ज झाले आहेत. ही माहिती दिल्लीचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने दिली आहे.
शेन वॉटसनने (Shane Watson) सांगितले की, डेविड वॉर्नर (David Warner) आणि एन्रीच नॉर्किया (Anrich Nortje) ७ एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (Lucknow Super Giants) खेळण्यासाठी उपस्थित असतील. वॉर्नर नुकताच पाकिस्तानहून परतला आहे. दुसरीकडे नॉर्किया दुखापतीतून बाहेर आला होता. तो मागील काही काळापासून दिल्ली कॅपिटल्स संघात जोडला गेला होता. मात्र, त्याची दुखापत संघासाठी चिंतेचा विषय होती. आता ही चिंतादेखील मिटली असून तो एकदम फिट झाला आहे.
Bas aapka hi intezaar tha David Bhai 🥺
Welcome back home to DC 💙#YehHaiNayiDilli | #IPL2022#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | @davidwarner31 | @TajMahalMumbai pic.twitter.com/Po8bB50ahK
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 3, 2022
रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्स संघाला आयपीएलच्या १५व्या हंगामातील पहिल्या २ सामन्यात जी कमतरता भासली होती. कदाचित ती कमतरता पुढील सामन्यांमध्ये भासणार नाही. याव्यतिरिक्त दिल्लीला एका चांगल्या सलामीवीराची आणि एका चांगल्या वेगवान गोलंदाजाची आवश्यकता होती. आता वॉर्नर आणि नॉर्कियामुळे ही कमतरता दूर होईल. पृथ्वी शॉला वॉर्नरच्या रूपाने नवीन जोडीदारही मिळेल. दुसरीकडे, नॉर्किया मुस्तफिजूर रहमानसोबत गोलंदाजीची धुरा सांभाळेल.
वॉर्नरच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १५० सामने खेळले असून त्यात त्याने ४१.६च्या सरासरीने ५४४९ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, नॉर्कियाने २४ आयपीएल सामने खेळताना ७.६५च्या इकॉनॉमी रेटने ३४ विकेट्स घेतल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. यातील १ सामन्यात पराभव आणि १ सामन्यात विजयासोबत दिल्ली संघ गुणतालिकेत ७व्या स्थानी आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2022| राजस्थानला मोठा धक्का; संघातील ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू १५व्या हंगामातून बाहेर