लोकप्रिय ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो, ज्यांनी गेल्या तीन विश्वचषकातील विजेता संघ आणि कर्णधाराविषयी अचूक भविष्यवाणी केली आहे. त्यांनी यावेळच्या विश्वचषकासाठी देखील एक भविष्यवाणी केली आहे. लोबो यांच्या मते, यावर्षी भारतात होत असलेल्या वनडे विश्वचषकात 1987 मध्ये जन्मलेला कर्णधार जिंकेल. लोबो यांनी 2011, 2015 आणि 2019 क्रिकेट विश्वचषक विजेत्यांचे अचूक भाकीत केले होते.
लोबो यांनी टेनिसमधील राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच, 2018 फिफा विश्वचषकातील फ्रान्स आणि फिफा विश्वचषक 2022 मध्ये लिओनेल मेस्सी यांच्याबाबत अचूक भविष्यवाणी केली होती.
क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर 2019 च्या विश्वचषकासाठी त्यांनी अचूक भाकीत केले होते. 1986 मध्ये जन्मलेला कर्णधारच विश्वचषक जिंकेल आणि मागच्या वेळी विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनचाही जन्म 1986 मध्ये झाला होता. यावेळी, त्याच्या अंदाजानुसार, 1987 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या नेतृत्वाखालील संघच विजेतेपदावर कब्जा करेल.
ग्रीनस्टोन लोबो यांचे भाकीत लक्षात घेतले तर, विश्वचषक 2023 मध्ये फक्त दोन कर्णधार आहेत ज्यांचा जन्म 1987 मध्ये झाला होता. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांचाच या साली जन्म झाला. अशा स्थितीत लोबो म्हणाले,
“शाकिब अल हसनचा जन्म 1987 मध्ये झाला आहे. पण बांगलादेश इतका चांगला संघ नाही, म्हणून 1987 मध्ये जन्मलेला दुसरा कर्णधार म्हणजे रोहित शर्मा हा विश्वचषक जिंकेल.”
लोबो यांचा अंदाज यावेळीही खरा ठरला तर भारत 12 वर्षांनंतर पुन्हा विश्वचषक ट्रॉफी उंचावेल. भारतीय संघाने यापूर्वी 2011 मध्ये विश्वचषक जिंकला होता.
(Astrologer Greenstone Lobo Predict Rohit Sharma Will Lift ODI World Cup Trophy)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बदलली पॉईंट्स टेबलची स्थिती, पाहा कोण, कुठल्या स्थानी उभा?
विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का?