भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल बुधवार (19 जानेवारी) संघासाठी सलामीला आला आणि द्विशतक ठोकले. सलामीवीर रोहित शर्मा अपेक्षित खेळी करू शकला नाही, पण शुबमनने द्विशक करत अनेक विक्रम नावावर केले. दुसरीकडे न्यूझीलंडसाठी मायकल ब्रेसवेल यानेही उत्कृष्ट प्रदर्शन केले. पण ब्रेसवेल न्यूझीलंडला विजय मिळवून देऊ शकला नाही. सामना संपल्यानंतर गिलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. फलंदाजी करताना त्याला स्वतःलाही द्विशतक होईल असे वाटले नव्हते, असे गिल म्हणाला.
भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि युवा शुबमन गिल (Shubman Gill) खेळपट्टीवर आले. रोहितने 38 चेंडूत 34 धावा केल्यानंतर विकेट गमावली, मात्र गिलने खेळपट्टीवर पाय घट्ट रोवले. गिलने एकूण 149 चेंडूंचा सामना केला आणि यात 208 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान गिलच्या बॅटमधून 19 चौकार आणि 9 षटकार निघाले. गिलच्या या अप्रतिम प्रदर्शनानंतर भारताने हा सामना 12 धावांच्या अंतराने नावावर केला आणि वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियवर हा सामना खेळला गेला.
सामना संपल्यानंतर सामनावीर ठरलेला शुबमन गिल म्हणाला, “मी मैदानात उतरण्यासाठी आणि जे करायचे होते, ते करण्यासाठी उत्सुक होतो. मला मोकळेपणाणे खेळायचे होते आणि मला आनंद आहे की मी शेवटी तसे केले देखील. कधी कधी गोलंदाज समोर असल्यावर त्याच्यावर दबाव टाकण्यासाठी तुम्हाला असे करावे लागते. मला चेंडू डॉट घालवायचे नव्हते. प्रत्यक्षात मी 200 धावांची विचार करत नव्हतो. पण 47 व्या षटकात षटकार मारल्यानंतर मला वाटले मी करू शकतो. त्याआधी मी चेंडू व्यवस्थित पाहून खेलत होतो.”
बुधवारी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केल्यानंतर गिल वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज बनला. यासाठी त्याने संघातील सहकारी खेळाडू ईशान किशन (Inshan Kishan) याचा विक्रम मोडला. ईशानने मागच्याच महिन्यात 24 वर्ष आणि 145 दिवस वय असताना 210 धावा केल्या होत्या. ईशान या खेलीनंतर सर्वात कमी वयात वनडे द्विशतक करणारा फलंदाज ठरलेला. पण बुधवारी गिलने ईशानचा विक्रम मोडत यादीत पहिला क्रमांक पटकावला. बुधवारी गिलचे वय 23 वर्ष आणि 132 दिवस होते. त्याव्यतिरित्क गिलने या सामन्यात स्वतःच्या 1000 वनडे धावा पूर्ण केल्या. कारकिर्दीतील 19 व्या वनडे डावात त्याने ही कामगिरी केली. पाकिस्तानच्याय इमाम उल हक याने देखील वनडे क्रिकेटमध्ये 19 डावांमध्ये 1000 धावा केल्या होत्या. आता इमाम आणि गिल या यादीत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. (At that moment Shubman Gill thought he could score a double century)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या वनडेत टीम इंडियाचा रोमांचक विजय! ब्रेसवेलची एकाकी झुंज अपयशी, सिराजची चालली जादू
गिलने मैदान मारलं! शुबमनचे न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी द्विशतक, गोलंदाजांची मोडली कंबर