टोकियो। ऑलिंपिक २०२० च्या आठव्या दिवशी (३० जुलै) महिलांची १०० मीटर स्प्रिंट शर्यत पार पडली. या शर्यतीत भारताच्या पदक विजेत्या द्युती चंदला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे ती उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. तिला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
द्युतीने ११.५४ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. विशेष म्हणजे या शर्यतीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या जमैकाची दिग्गज ऍथलिट शेली- ऍन फ्रेसर- प्रायस आणि द्युतीमधील अंतर हे ०.१४८ सेकंद इतके होते. (Athletics Women’s 100m Round 1 (heat) Dutee Chand fails to qualify)
#IND's national record holder in women's 100m @DuteeChand falls short of striding her way to the next round as she finishes seventh with a timing of 11.54s in heat 5️⃣
The heat was won by #JAM's @realshellyannfp! 🙌#StrongerTogether | #UnitedByEmotion | #Tokyo2020 | #Athletics
— Olympic Khel (@OlympicKhel) July 30, 2021
दोन वेळची ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेती आणि रियो ऑलिंपिक २०१६ ची कांस्य पदक विजेत्या शेली- ऍन फ्रेसर- प्रायसने ही शर्यत १०.८४ सेकंदात पूर्ण केली. यासोबतच तिने उपांत्य फेरीसाठी प्रवेश मिळवला आहे. ही शर्यत शनिवारी (३१ जुलै) होणार आहे.
द्युती चंदला अर्जुन अवॉर्डने गौरवण्यात आले होते. याव्यतिरिक्त तिने एशियन गेम्स २०१८ मध्ये रौप्य पदकावरही आपले नाव कोरले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-