भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) यांच्यात टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 चा सुपर 12चा सामना खेळला जाणार आहे. रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशाचे चाहते चांगलेच उत्सुक असून, क्रिकेटविश्वताही एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. मैदाना बाहेरही समीक्षकांमध्ये या सामन्याविषयी उत्सुकता असून, आता समीक्षकांमध्ये देखील वाकयुद्ध रंगले.
भारत आणि पाकिस्तानमधील दोन वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमात बोलताना भारताचे माजी अष्टपैलू अतुल वासन व पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हे आमनेसामने आले. या कार्यक्रमात बोलताना वासन यांनी पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याच्याविषयी मोठे वक्तव्य केले. वासन म्हणाले,
“भारताकडे रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यासारखे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांचे जागतिक क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे. त्यांनी अनेक सामने देशाला जिंकून दिलेत. त्या तुलनेने पाकिस्तानकडे असे खेळाडू कमी आहेत. तुम्हाला एखाद दुसरा सामना जिंकून देणारा मोहम्मद रिझवान जागतिक दर्जाचा खेळाडू होत नाही. केवळ त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.”
वासन यांचे हे वक्तव्य शाहिद आफ्रिदी याला पटले नाही. त्याने यावर उत्तर देताना म्हटले,
“तुम्ही तुमच्या खेळाडूंना डोक्यावर घेऊन बसला आहात. आमचे खेळाडू क्रमवारी पहिल्या दुसऱ्या स्थानी असले तरी त्यांना मान नाही.”
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान मागील विश्वचषकात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 गडी राखून पराभूत केले होते. त्यामुळे यावेळी त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाकडे असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान वेगळाचं! भारतावर पडलायं भारी, एकदा आकडेवारी पाहाच
‘त्यांनी चांगली गोलंदाजी केली’, अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांच्या बॉलर्सचे बटलरकडून कौतुक