---Advertisement---

IND vs PAK: “मला वाटतं की पाकिस्तान जिंकावा” माजी भारतीय क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं उडाली खळबळ!

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2025 9:33 PM
---Advertisement---

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा (ICC Champions Trophy 2025) थरार आता चांगलाच रंगला आहे. आता चॅम्पियन्स ट्राॅफीच्या हायव्होल्टेज सामन्याची चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघ उद्या (23 फेब्रुवारी) रोजी दुबईच्या स्टेडियमवर आमने-सामने असणार आहेत. दरम्यान दोन्ही संघात चुरशीची लढत पाहायला मिळेल. तत्पूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटूने मोठे वक्तव्य केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या सामन्यासाठी, असा एकही भारतीय चाहता नसेल जो आपल्या भारतीय संघाच्या विजयाची इच्छा व्यक्त करत नसेल. पण यादरम्यान, भारतीय क्रिकेट संघातील एका माजी क्रिकेटपटूने म्हटले आहे की पाकिस्तान जिंकेल. त्याने स्पष्टपणे म्हटले आहे की पाकिस्तानने हा सामना जिंकला पाहिजे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज अतुल वसानने (Atul Wassan) एक आश्चर्यकारक विधान केले आहे. भारत-पाकिस्तान ब्लॉकबस्टरपूर्वीच्या आपल्या विधानाने या दिग्गज खेळाडूने खळबळ उडवून दिली आहे. भारतीय संघासाठी 4 कसोटी आणि 9 वनडे सामने खेळणारा दिल्लीचा हा माजी क्रिकेटपटू म्हणाला की, स्पर्धेच्या उत्साहासाठी पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवला तर ते चांगले होईल. यामुळे स्पर्धा आणखी रोमांचक होईल.

माजी क्रिकेटपटू अतुल वसान म्हणाला की, “मला वाटतंय की पाकिस्तानने सामना जिंकला पाहिजे. कारण त्यामुळे उर्वरित स्पर्धा अधिक रोमांचक होईल. जर पाकिस्तान चांगला खेळला आणि जिंकला तर ती एक चांगली स्पर्धा असेल. हे अमिताभ बच्चनसारखे आहे. जर तो खलनायकाला मुक्का मारत राहिला तर ते पाहण्यात मजा नाही. मला आशा आहे की पाकिस्तान परत उडी मारेल. ते स्पर्धेसाठी चांगले असेल.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “मी 90 च्या दशकात खेळलो तेव्हा पाकिस्तानकडे काही उत्तम खेळाडू होते. वसीम अक्रम, वकार युनूस आणि सईद अन्वर. आम्ही अनेकदा त्यांच्याकडून हरलो. पाकिस्तानमध्ये जे काही घडले, त्याचा त्यांच्या क्रिकेटवर परिणाम झाला आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. दरम्यान, भारत अधिक मजबूत झाला. 2000च्या दशकापासून आम्ही त्यांच्यावर वर्चस्व गाजवत आहोत.”

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय संघाची चिंता वाढली! यष्टीरक्षकाला ताप, काय म्हणाला शुबमन गिल.??
इंग्लंडच्या बेन डकेटने रचला नवा इतिहास, भारतीय दिग्गजांना सोडले मागे!
चॅम्पियन्स ट्रॉफीतील महासंग्राम: भारत-पाकिस्तान सामना कोण मारेल बाजी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---