इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) (IPL)ही जगातील सर्वात लोकप्रिय लीग आहे. ही सुरू होण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या २ वर्षांपासून ही स्पर्धा यूएईमध्ये पार पडत आहे. तसेच आगामी लीग स्पर्धा भारतात आयोजित करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत २ नव्या संघाची एन्ट्री झाली आहे. तर खेळाडूंचा मोठा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. आता हा लिलाव कधी आयोजित होणार याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, “आम्ही पुढील मेगा लिलाव बेंगलोरमध्ये आयोजित करण्याचा विचार करत आहोत. जर कोरोनाची स्थिती नियंत्रणात असेल तर हा लिलाव सोहळा ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी पार पडेल.” आयपीएल २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा भारतात आयोजित केला गेला होता. त्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे या स्पर्धेतील पुढील सामने यूएईमध्ये आयोजित केले गेले होते.(IPL auction date)
आतापर्यंत ८ संघ आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरत होते. परंतु आगामी हंगामात ८ नव्हे तर १० संघ जेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत असणार आहे. ज्यामध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन्ही संघांचा समावेश आहे. या दोन्ही संघांना लवकरच रीटेन केलेल्या ३ खेळाडूंची यादी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे वाचा : ऋतुराज ते अय्यर, आयपीएलपासून ते टी२० विश्वचषक; ‘या’ १० युवा खेळाडूंचा राहिला बोलबाला
लखनऊ संघाबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने आगामी हंगामासाठी आपल्या प्रशिक्षकांची घोषणा केली आहे. झिम्बाब्वे संघाचे माजी क्रिकेटपटू आणि इंग्लंडचे माजी प्रशिक्षक एंडी फ्लॉवर या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत. तर माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीरची मेंटोर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी रीटेन केलेल्या खेळाडूंची यादी
चेन्नई सुपर किंग्ज : रवींद्र जडेजा (१६ कोटी रुपये), एमएस धोनी (१२ कोटी), मोईन अली (८ कोटी ) ऋतुराज गायकवाड ( ६ कोटी)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : विराट कोहली (१६ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी), मोहम्मद सिराज (७ कोटी)
पंजाब किंग्ज: मयंक अग्रवाल (१२ कोटी, १४ कोट), अर्शदीप सिंग (४ कोटी)
दिल्ली कॅपिटल्स: रिषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (९ कोटी), पृथ्वी शॉ (७.५ कोटी), एनरिक नॉर्खिया (६.५ कोटी)
सनरायझर्स हैदराबाद: केन विलियमसन (१४ कोटी), अब्दुल समद (४ कोटी), उमरान मलिक (४ कोटी)
कोलकाता नाइट रायडर्स: आंद्रे रसेल (१२ कोटी) वरुण चक्रवर्ती (८ कोटी), व्यंकटेश अय्यर (८ कोटी), सुनील नरेन (६ कोटी)
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमराह (१२ कोटी), सूर्यकुमार यादव (८ कोटी), कायरन पोलार्ड (६ कोटी)
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (१४ कोटी), जोस बटलर (१० कोटी), यशस्वी जयस्वाल (४ कोटी)
महत्वाच्या बातम्या :
भारत, पाकिस्तानसह ‘असे’ आहेत अंडर-१९ विश्वचषकासाठीचे सर्व संघ, वाचा एका क्लिकवर
क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना अश्विनसाठी देवासारखा धावून आलेला धोनी! दिलेला ‘कामाचा सल्ला’
हे नक्की पाहा: