अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात गुरूवारपासून (6डिसेंबर) पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. यामध्ये भारत तिसऱ्या दिवसाखेर 166 धावांनी आघाडीवर आहे.
नाणेफेक जिंकत भारताने पहिल्या डावात सर्वबाद 250 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 235 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात विकेट्स पडत असताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याच्या आक्रमक पद्धतीने आनंद व्यक्त केला होता. यामुळे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी त्याच्यावर कडाडून टिका करत कोहलीने कर्णधार पदाच्या मर्यादा बाळगाव्या असे सुचविले आहे.
कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक विकेट्सवर आक्रमकपणे जल्लोष केला होता. “आमच्या खेळाडूंनी असा जल्लोष केला असता तर त्यांना नावे ठेवली असती”, असे म्हणत यावर लॅंगर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लॅंगर याच्या टिकेला भारतीय माजी क्रिकटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी उत्तर दिले आहे.
“आपण तेथे देशासाठी चांगले खेळण्यासाठी गेलो आहेत. आपण मग मैदानावर कशा पद्धतीने आनंद व्यक्त करतो याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तसेच प्रेक्षक त्याला कशाप्रकारे बघतात हे काही तेवढे महत्त्वाचे नसून आपला खेळ सर्वात महत्त्वाचा आहे”, अशा शब्दात लक्ष्मणने लॅंगर यांना उत्तर दिले.
“ऑस्टेलियाच्या प्रशिक्षकांनी आणि खेळाडूंनी कोहलीच्या आनंद साजरा करण्याचा वेगळाच अर्थ घेतला आहे.” असेही व्हीव्हीएस लक्ष्मण पुढे म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलियाकडून पुन्हा रडीचा डाव, आता कोहली निशाण्यावर
–८७ वर्षांत जे कुणालाही जमलं नाही ते विराटने करुन दाखवलं
–असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय