---Advertisement---

Video – वाढदिवशी श्रेयस अय्यरने ठोकला तब्बल ‘इतक्या’ मीटरचा षटकार की विराटही झाला अचंबित

On: सोमवार, डिसेंबर 7, 2020 8:39 AM
---Advertisement---

रविवारी (6 डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेट मैदानात खेळण्यात आलेल्या तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतील दुसर्‍या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 या फरकाने विजयी आघाडी घेतली. या सामन्याचे हिरो हार्दिक आणि शिखर राहिले. मात्र या सामन्यात श्रेयस अय्यरने ही आकर्षक खेळी केली. या सामन्यात ‘बर्थडे बॉय’ श्रेयस अय्यरने इतका मोठा षटकार ठोकला की विराट कोहलीला ही विश्वास बसला नाही.

17. 4 षटकात श्रेयस अय्यरने ऍडम झंम्पाच्या गोलंदाजीवर तब्बल 111 मीटर लांबीचा मोठा षटकार ठोकला. अय्यरचा हा षटकार पाहून भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुल देखील चकीत झाले. त्याचबरोबर भारतीय संघातील सहाय्यक सदस्य सुद्धा खुर्चीवर उठून हा षटकार पाहू लागले. हा षटकार पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचाही कडकडाट झाला.

https://twitter.com/DelhiCapitals/status/1335556281176739840

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेत अपयशी ठरलेल्या श्रेयसने या सामन्यात 5 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने नाबाद 12 धावा केल्या.

यापूर्वी वनडे मालिकेत श्रेयस अय्यरने तीन सामन्यात 2, 38 आणि 19 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याला एक ही षटकार ठोकता आला नव्हता. अशात पहिल्या सामन्यात त्याला बाहेर ठेवून मनीष पांडेला संधी देण्यात आली होती. पंरतु दुसर्‍या सामन्यात पांडे दुखापतग्रस्त असल्याने त्याला संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले.

रविवारी अय्यर विराट कोहली बाद झाल्यानंतर फलंदाजीला आला होता आणि त्याने हार्दिक पंड्या (42*) सोबत 5 व्या विकेटसाठी नाबाद 46 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, या सामन्यात शिखर धवनने 36 चेंडूत 52 धावांची खेळी केली होती, त्यानंतर हार्दिकने आक्रमक पद्धतीने खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याने 22 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 42 धावांची खेळी केली. यामधे त्याचा स्ट्राईक रेट 190. 90 राहिला. त्यामुळे हार्दिक पंड्याला सामनावीराचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

यापूर्वी पहिल्या टी20 सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे दुसरा टी20 सामनाही जिंकून भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

सामन्यानंतर कोहलीला आली ‘हिटमॅनची’ आठवण; पहा काय म्हणाला

भारताच्या ‘या’ खेळाडूला पाहुन ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाला आली एमएस धोनीची आठवण

श्रेयस अय्यरसाठी वाढदिवस ठरला खास, एबी डिविलियर्सची केली बरोबरी

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---