ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाचा शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे द गॅबा स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना असणार आहे. या सामन्यत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. भारताने या सामन्यासाठी आपल्या संघात ४ बदल केले आहेत. तसेच भारताकडून २ खेळाडू कसोटी पदार्पण करत आहेत.
या सामन्याआधी भारताला दुखापतींमुळे जोरदार धक्के बसले आहेत. त्यामुळे भारताला अंतिम ११ जणांच्या संघात मोठे बदल करावे लागले आहेत. भारताने दुखापतग्रस्त हनुमा विहारी ऐवजी ११ जणांच्या संघात मयंक अगरवालला संधी दिली आहे. तर रविंद्र जडेजाऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने तो या सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे आता सुंदरचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे.
याशिवाय ओटीपोटात ताण आल्याने जसप्रीत बुमराह देखील या सामन्याला मुकणार असून त्याच्याऐवजी अंतिम ११ जणांच्या भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. याबरोबरच आर अश्विन देखील पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असून त्याच्याऐवजी टी नटराजनला कसोटीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. भारताकडून कसोटीमध्ये पदार्पण करणारा तो ३०० वा तर सैनी ३०१ वा खेळाडू ठरला आहे. या ४ बदलांशिवाय सिडनी येथे तिसऱ्या कसोटीत खेळलेले ७ खेळाडू ब्रिस्बेन कसोटीसाठीही संघात कायम आहेत.
या सामन्यासाठीही भारतीय संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे आणि उपकर्णधारपद रोहित शर्माकडे कायम आहे.
मालिकेतील स्थिती –
ब्रिस्बेन येथे होणारा हा सामना कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आहे. कारण या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता, तसेच तिसरा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना जो जिंकेल तो संघ मालिका जिंकेल. तर जर हा सामना अनिर्णित राहिला तर मालिकाही बरोबरीत सुटेल.
ब्रिस्बेनला होणारा हा सामना १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान होणार असून या सामन्यातील खेळाला प्रत्येक दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५.३० वाजता सुरुवात होणार आहे.
असा आहे चौथ्या कसोटीसाठी भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
शुभमन गिल, रोहित शर्मा(उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिषभ पंत, मयंक अगरवाल, टी नटराजन, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रिस्बेन कसोटीसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ, पुकोस्कीच्या जागेवर ‘या’ खेळाडूला संधी
चर्चा तर झालीच पाहिजे! ३७ चेंडूत शतक करणाऱ्या अझरुद्दीनला मिळाले रोहित, रिषभच्या पंक्तींत स्थान
दुखापतग्रस्त हनुमा विहारीच्या जागी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी ‘हे’ तीन खेळाडू प्रमुख दावेदार