ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने एक नवी घोषणा केली आहे. ऍडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दिवस-रात्र होणाऱ्या कसोटी सामन्यामध्ये प्रेक्षकांना मैदानावर येऊन सामना पाहण्याची परवानगी देत असल्याचे ऑस्ट्रेलिया क्रिकेटने जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या म्हणण्यानुसार या सामन्यादरम्यान 50 टक्के प्रेक्षक स्टेडियममध्ये येऊ शकतात.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबरपासून 3 एकदिवसीय सामने, 3 टी -20 आंतरराष्ट्रीय आणि 4 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार असून हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान खेळल्या जाणार्या बॉक्सिंग डे कसोटीत देखील 25 टक्के प्रेक्षक स्टेडियमवर बसू शकतील. तर ब्रिस्बेनमधील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात 75 टक्के प्रेक्षक हा सामना मैदानातून पाहतील असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील स्पष्ट केले आहे.
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
Video -“तुला ऑस्ट्रेलियातच भेटेल”, डेविड वॉर्नरचा हैदराबादच्या यॉर्कर किंगला खास संदेश
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
ट्रेंडिंग लेख –
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय