भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी सिडनी येथे पोहोचला आहे. या दौऱ्यात संघाला तीन वनडे सामने, तीन टी-20 आणि चार कसोटी सामने खेळायचे आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना 27 नोव्हेंबरला खेळला जाईल. दौर्याचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी संघ सध्या 14 दिवस क्वारंटाइनमध्ये आहे. रविवारी (१५ नोव्हेंबर) पहिल्या नेट सरावात एकाच वेळी सर्व खेळाडूंनी पांढर्या आणि लाल चेंडूने सराव केला. दरम्यान, आयपीएल 2020 मधून टीम इंडियामध्ये निवडला गेलेला वेगवान गोलंदाज टी नटराजननेही प्रशिक्षक रवी शास्त्रीसमोर आपले गोलंदाजी कौशल्य दाखवले.
हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. बोर्डाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही टी नटराजनला आयपीएल 2020 मध्ये गोलंदाजी करताना पाहिले आहे आणि त्यात त्याला यश मिळाले आहे. आता भारतीय राष्ट्रीय संघात प्रथमच स्थान मिळवल्यानंतर संघाच्या सराव सत्रात तो गोलंदाजी करीत आहे. स्वप्न सत्यात उतरणारा क्षण.”
We have seen him bowl with a lot of success in the @IPL and here is @Natarajan_91 bowling in the #TeamIndia nets for the first time after his maiden India call-up! A dream come true moment. 👏 pic.twitter.com/WqrPI0Ab7I
— BCCI (@BCCI) November 15, 2020
सनरायझर्स हैदराबादकडून या हंगामात 29 वर्षीय नटराजनने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या अचूक यॉर्करचा बळी ठरवले होते. म्हणूनच ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी निवडलेल्या टी -20 संघाचा तो एक भाग आहे. खांद्याला दुखापत झाल्याने त्याला फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या जागी संघात स्थान देण्यात आले. नटराजने आयपीएल 2020 च्या हंगामात हैदराबादकडून 16 सामन्यांत 16 गडी बाद केले. यावेळी त्याने प्लेऑफमध्ये एलिमिनेटर आणि त्यानंतर दुसर्या क्वालिफायरमध्ये संघाला स्थान मिळवून देण्यात मुख्य भूमिका बजावली.
महत्त्वाच्या बातम्या-
किंग्ज इलेव्हन पंजाबने ‘या’ तिघांची करावी हाकालपट्टी, माजी दिग्गजाचे रोखठोक मत
आयपीएल २०२१ च्या लिलावापूर्वी बीसीसीआय करणार ‘या’ टी२० स्पर्धेचे आयोजन?
आयपीएल २०२०मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ५ धडाकेबाज फलंदाज, इंग्लंडच्या माजी दिग्गजाने केली निवड
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर