---Advertisement---

Usman Khawaja Shoe Controversy: ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या बुटांवरील संदेशाने वादाला ठिणगी, प्रकरण काय?

On: बुधवार, डिसेंबर 13, 2023 12:55 PM
Usman-Khawaja
---Advertisement---

Usman Khawaja Shoes Controversy: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात गुरुवारपासून (दि. 14 डिसेंबर) 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी उस्मान ख्वाजा हादेखील ऑस्ट्रेलिया संघाचा भाग आहे. मात्र, या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच उस्मान ख्वाजा चर्चेचा धनी ठरला आहे. ही चर्चा त्याच्या फॉर्म किंवा कोणत्याही विधानामुळे नाहीये, तर एका संदेशावरून होत आहे, जो क्रिकेटर आपल्या बूटांमार्फत देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, याने आता वादाचे रूप घेतले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
खरं तर, ऑस्ट्रेलिया (Australia) संघाच्या उन्हाळी हंगामाची सुरुवात होत आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (AUSvsPAK) संघातील पहिल्या कसोटीवेळी उस्मान ख्वाजा पॅलेस्टाईन (Usman Khawaja Palestine) लोकांच्या समर्थनासाठी बूट घालणार होता. तो सराव सत्रादरम्यानही त्या बुटांसोबत दिसला. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयसीसी नियमांचा हवाला देत एक निवेदन जारी केले आणि गुरुवारपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्यात सलामी फलंदाजाला ते बूट घालता येणार नाहीत.

ऑस्ट्रेलियाचा 36 वर्षीय ख्वाजाने आधीही सोशल मीडियावर इस्रायल (Israel) आणि हमासमध्ये सुरू असलेल्या वादावर मोकळेपणाने चर्चा केली. ख्वाजा मंगळवारी सराव सत्रादरम्यान आपल्या बूटांवर ‘स्वातंत्र्य हा एक मानवी अधिकार आहे’ आणि ‘सर्वांचे जीवन समान आहे’ असे लिहिले होते. तसेच, द ऑस्ट्रेलियनच्या वृत्तानुसार, ख्वाजाचे याबाबत म्हणणे आहे की, त्याच्या बुटांवर एक मानवाधिकार संकेत आहे, तो कोणाचेही समर्थन किंवा विरोध करत नाहीये.

पहिल्या कसोटीसाठी हे बूट परिधान करण्याच्या प्रयत्नानंतरही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयसीसी नियमामुळे ख्वाजाला ते परिधान करण्यास नाकारले. बुधवारी (दि. 13 डिसेंबर) एक निवेदन जारी करत ऑस्ट्रेलियाने म्हटले की, “आम्ही आमच्या खेळाडूंच्या वैयक्तिक मत व्यक्त करण्याच्या अधिकारांचे समर्थन करतो, पण आयसीसीकडे असे नियम आहेत, जे वैयक्तिक संदेशांच्या प्रदर्शनावर बंदी आणतात. या नियमांचे आम्ही खेळाडूंकडून पालन होण्याची अपेक्षा करतो.”

अशात कर्णधार पॅट कमिन्स यानेही याची पुष्टी केली आहे की, उस्मान ख्वाजा पहिल्या कसोटीमध्ये ते बूट घालणार नाहीये. (aussie cricketer usman khawaja shoes controversy australian cricketer has support for palestine)

हेही वाचा-
अरेरे! दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतीय सलामी जोडीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, 7 वर्षांनंतर ओढवली ‘अशी’ वेळ
INDvsSA: दक्षिण आफ्रिकेला घाम फोडणाऱ्या रिंकूने सामन्यानंतर का मागितली माफी? लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---