ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटर स्टीव्ह वाॅ यांचा मुलगा ऑस्टीन वाॅ याने वयाच्या 21 व्या वर्षी क्रिकेट पासून काही कालावधीसाठी दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध अडनावामुळे त्याच्यावर दबाव येत असल्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. ऑस्टिन क्लब सदरलॅंडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
सदरलँड्सचा कर्णधार बेन ड्वारशुइसने संडे टेलिग्राफ सोबत बोलताना म्हणाला,”तो प्रतिभावान खेळाडू आहे. परंतू त्याच्यावर खेळण्याचा दबाव टाकला जाऊ शकत नाही. कदाचित त्याच्यावर आडनावाने खुप दबाव टाकला आहे. मला वाटत आहे की त्याने यापासून दूर राहून आनंद घेतला पाहिजे. अशा आहे की तो एक वर्ष क्रिकेट पासून दूर राहून पुन्हा पुनरागमन करेल. कारण त्याचे क्रिकेटवर प्रेम आहे.”
ऑस्टीन हा ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाकडून 2018 मध्ये आयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळला आहे. त्या स्पर्धेत तो फक्त दोन सामने खेळला होता. यातील एक सामना तो भारताविरुद्ध खेळला होता. तो मध्यमगती गोलंदाज ही आहे. त्याने भारताविरुद्ध खेळताना अनुकूल रॉयला बाद केले होते.
तो 2016 मध्ये बिग बॅश लीगपूर्वी पॉन्टिंग इलेव्हनसाठी गिलख्रिस्ट इलेव्हन विरुद्ध खेळला होता. तेव्हा तो 17 वर्षाचा होता आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ब्रेडली होपला त्याने मोठा षटकार ठोकला होता. या फटक्याची समालोचकांनी खुप स्तुती केली होती. त्यावेळी एक समालोचक म्हणाला होता,” मला माहित नाही त्याने हा फटका कसा मारला, त्याची टायमिंग गजब आहे.”
वॉ हे नाव ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठे आहे. ऑस्टिनचे वडील स्टिव्ह वॉ ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत. तसेच त्याचे काका म्हणजेच स्टिव्ह वॉ यांचे जुळे बंधू मार्क वॉ हे देखील ऑस्ट्रेलियाकडून खेळले आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना १६ हजारांपेक्षाही अधिक धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅप्टन कोहलीचा नाद खुळा! असा ‘विराट’ कारनामा करणारा जगातील पहिलाच कर्णधार
“मलाही आश्चर्य वाटले”, ‘त्या’ फटक्यावर कोहलीची गमतीशीर प्रतिक्रिया
Video – वाढदिवशी श्रेयस अय्यरने ठोकला तब्बल ‘इतक्या’ मीटरचा षटकार की विराटही झाला अचंबित
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग