---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ! दुसऱ्या सराव सामन्यातून मोझेस हेन्रीक्स बाहेर; ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

On: गुरूवार, डिसेंबर 10, 2020 9:30 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यात तीन दिवसीय सराव सामना 11 डिसेंबरपासून सिडनी येथे खेळला जाणार आहे. हा सराव सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया अ कडून या सराव सामन्यात दुखापतीमुळे मोझेस हेन्रीक्स खेळू शकणार नाही. त्याची ऑस्ट्रेलिया अ संघात निवड झाली होती. मात्र, भारताविरुद्ध होणार्‍या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर मालिकेत त्याची निवड झाली नव्हती.

हेन्रीक्सच्या जागी जॅक विल्डरमथला मिळाले संघात स्थान
‘द वेस्ट ऑस्ट्रेलिया’च्या अहवालानुसार, अष्टपैलू खेळाडू हेन्रीक्स हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यात भाग घेवू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूंची संख्या वाढणे सुरू आहे. क्वीन्सलँडचा अष्टपैलू जॅक विल्डरमथला त्याच्या जागी ऑस्ट्रेलिया अ संघात स्थान देण्यात आले आहे.

विल पुकोव्हस्कीच्या हेल्मेटला लागला होता कार्तिक त्यागीचा चेंडू
यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यानंतर युवा फलंदाज विल पुकोव्हस्कीला डोक्याला दुखापत झाली आहे, तर जोश हेझलवूड आणि मिचल स्टार्क यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पुकोव्हस्कीला पहिल्या सराव सामन्यात वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीचा चेंडू हेल्मेटवर लागला होता. त्यानंतर त्याला मैदान सोडून जावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत

“ड्रिंकदरम्यान शास्त्रींनी सांगितले, ‘हा’ असेल टीम इंडियाचा तिसरा वेगवान गोलंदाज”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा खुलासा

तब्बल १० खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी परतणार भारतात, पाहा संपूर्ण यादी

ट्रेंडिंग लेख-

शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ

अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’

अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---