३० मेपासून सुरु होणाऱ्या आयसीसीच्या १२ व्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी अनेक दिग्गजांनी आपली मते मांडली आहेत. तसेच अनेकांच्या मते भारत आणि इंग्लंड हे या विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार आहेत.
पण असे असले तरी भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने भारतासमोर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांचे मोठे आव्हान असल्याचे म्हटले आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार सचिन भारतासमोर असलेल्या प्रतिस्पर्धी संघाच्या आव्हानाबद्दल म्हणाला, ‘इंग्लंड एक असेल आणि ऑस्ट्रेलियाही असेल. तसेच दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे अन्य दोन संघही आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज देखील मजबूत संघ आहेत. पण जर मला दोन संघ निवडायचे असतील तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धचे सामने महत्त्वाचे असतील.’
ऑस्ट्रेलिया हा संघ गतविजेता असून सध्या चांगल्या लयीत खेळत आहे. त्यांनी त्यांचे मागील ८ वनडे सामने जिंकले आहेत. यात भारताविरुद्धच्या ३ सामन्यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी इंग्लंड आणि श्रीलंका विरुद्धचे त्यांचे सराव सामनेही जिंकले आहेत.
दुसरीकडे इंग्लंड आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असून ते या विश्वचषकात यजमान म्हणून खेळणार आहेत. त्यांना येथील परिस्थितीचा चांगला अंदाज असेल. त्यामुळे आता सचिनने म्हणल्याप्रमाणे भारतीय संघ या दोन संघांच्या आव्हानाला कसा सामोरा जाणार हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.
या विश्वचषकात भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना ९ जूनला ओव्हल मैदानावर लंडन येथे पार पडणार आहे. तर इंग्लंड विरुद्ध भारत हा सामना ३० जूनला बर्मिंगहॅम येथे पार पडेल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–२०१९ विश्वचषक विजेतेपदासाठीच्या प्रबळ दावेदाराबद्दल महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणतो…
–धोनीच्या टिकाकारांना ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूने सुनावले खडेबोल





