आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक (ICC U19 World Cup) पुढच्या वर्षी वेस्ट इंडीजमध्ये म्हणजेच कॅरिबियन बेटांवर खेळवला जाणार आहे. ज्याची तयारी सर्व संघांनी सुरू केली आहे. आता या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला आहे.
ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या १९ वर्षांखालील संघात कूपर कॉनलेला (Cooper Connolly) सुद्धा संघात घेण्यात आलं आहे. हा त्याचा दुसरा १९ वर्षांखालील विश्वचषक असणार आहे. याआधी तो दक्षिण आफ्रिकेत खेळवला गेलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकमध्येसुद्धा ऑस्ट्रेलिया संघात होता. कूपरसोबत १७ वर्षीय हरकीरत बाजवा (Harkirat Bajwa) सुद्धा संघात आपली जागा कायम ठेवू शकला.
१९ वर्षांखालील विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला गट ड मध्ये ठेवण्यात आलं आहे. त्या गटात यजमान वेस्टइंडीज, स्कॉटलँड आणि श्रीलंका हे इतर संघ आहेत. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक अँथनी क्लार्क (Anthony Clark) असतील.
संघात प्रत्येक प्रकारचा खेळाडू- प्रशिक्षक
ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक म्हणाले, “संघात प्रत्येक प्रकारचा खेळाडू आहे. स्पर्धेतला उत्साह खेळाडूंमध्ये देखील आहे, ज्यांच्याकडे देशांतर्गत स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. यातले काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी आधी उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे.”
ते म्हणाले, “मला विश्वास आहे १९ वर्षांखालील विश्वचषकात ते अजून चांगले खेळतील. त्यांच्याकडे संधी चालून आली आहे आणि त्याचं सोनंसुद्धा करता आलं पाहिजे. त्यामुळे स्पर्धेत कुठल्या अंदाजाने खेळतात हे बघण्यासारखं आहे.”
१९ वर्षांखालील विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ:
हरकीरत बाजवा, एडेन काहिल, कूपर कॉनले, जोशुआ गार्नर, इशाक हिगिन्स, कँपबेल केलावे, कोरे मिलर, जॅक निस्बेट, निवेतन राधाकृष्णन, विलियम साल्जमन, लॅकलान शॉ, जॅक्सन सिनफील्ड, तोबियास स्नेल, टॉम विटने, टीग विली
राखीव खेळाडू: लियाम ब्लॅकफोर्ड, लियाम डॉडरेल, जोएल डेविस, सैम राहले, ऑब्रे स्टॉकडेल
महत्त्वाच्या बातम्या –
“आम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला”, रोहितने विराटच्या नेतृत्वाचे गायले गुणगान
‘मदीपा’चा बदला! जेव्हा मदन लालने सर विवियन रिचर्ड्सला दिले होते चोख प्रत्युत्तर, वाचा तो किस्सा
तेंडुलकरपर्यंत पोहचली पायाने वाईड देण्याऱ्या पंचाची ख्याती; मास्टर-ब्लास्टर म्हणतोय…