ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUSvENG) यांच्यामधील प्रतिष्ठित ऍशेस कसोटी मालिका (Ashes Series) सध्या सुरू आहे. ब्रिस्बेन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ९ गड्यांनी दणदणीत पराभव करत मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना ऍडीलेड (Adelaide Day-Night Test) येथे सुरू होईल. दिवस-रात्र स्वरूपाच्या या सामन्याला १६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र, सामन्याच्या एक दिवस आधीच ऑस्ट्रेलियन संघाने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड (Josh Hazlewood Injured) याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन (Jhy Richardson) याला या सामन्यात संधी दिली गेली आहे.
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय
ब्रिस्बेन येथील प्रसिद्ध गाबा मैदानावर (Brisbane Test) झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला एकतर्फी धूळ चारली. इंग्लंडचा पहिला डाव केवळ १४७ धावांमध्ये संपविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेड याचे शतक व डेव्हिड वॉर्नर व मार्नस लॅब्युशेन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली होती. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कर्णधार जो रूट व डेविड मलान यांनी काहीसा संघर्ष केला. मात्र, दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनच्या फिरकी पुढे ते तग धरू शकले नाहीत. परिणामी, विजयासाठी मिळालेले २० धावांची किरकोळ आव्हान ऑस्ट्रेलियाने एका गड्याच्या मोबदल्यात पार केले.
हेजलवूड झाला दुखापतग्रस्त
ब्रिस्बेन कसोटीत वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड क्षेत्ररक्षणावेळी दुखापतग्रस्त झाला होता. त्यासोबतच सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यादेखील या कसोटीत खेळण्यावर शंका होती. मात्र, तो दुखापतीतून सावरला आहे. मात्र, हेजलवूड संघाचा भाग नसेल. हेजलवूडने पहिल्या सामन्यात तीन बळी मिळविले होते.
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ-
डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरीस, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन व नॅथन लायन.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी मागच्या अडीच वर्षांपासून हेच सांगत आलोय’, रोहित विषयीच्या प्रश्नावर अखेर विराटचे स्पष्टीकरण