भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी यजमानांनी आपला संघ जाहीर केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी एकूण 13 खेळाडूंची निवड केली आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाचा कर्णधार नॅथन मॅकस्वीनी आणि जोश इंग्लिस यांनाही स्थान मिळाले आहे. मॅकस्वीनी उस्मान ख्वाजासह पर्थमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. परंतु बोर्डाने अचानक जोश इंग्लिसचा संघात समावेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे
ऑस्ट्रेलियाकडून 25 एकदिवसीय आणि 26 टी20 सामने खेळलेला जोश इंग्लिस पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करण्यात व्यस्त आहे. भारताविरुद्धच्या संघात त्याचे नाव असणे म्हणजे तो पदार्पणाचाही प्रबळ दावेदार आहे.
अपेक्षेप्रमाणे स्कॉट बोलंडचा बॅकअप वेगवान गोलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. पहिल्या कसोटीत पॅट कमिन्ससह फक्त मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतील.
SQUAD 🤩 The Border-Gavaskar Trophy is almost upon our men’s national team, with 13 of our very best ready and raring to face India in Perth later this month #AUSvIND pic.twitter.com/QbRVJNmllw
— Cricket Australia (@CricketAus) November 9, 2024
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्हन स्मिथ, मिशेल स्टार.
भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
हेही वाचा-
मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट, अनेक जणांचा मृत्यू
ऑस्ट्रेलियन लीगमध्ये भारतीय खेळाडूंचं वर्चस्व, धमाकेदार खेळीसह मिळवून दिला संघाला विजय
ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मोडमध्ये होणार, या देशांत खेळले जाऊ शकतात भारताचे सामने