भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन येथील गाबा येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाआधी ऑस्ट्रेलियासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज जोश हेझलवूड जखमी झाला. मात्र दिवसाच्या खेळाच्या पहिल्या तासाभरासाठी मैदानावर दिसला, ज्यात त्याने एक षटक टाकले. पण नंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले. अशाप्रकारे या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. जोश हेझलवूडला त्याच्या स्नायूंमध्ये समस्या असल्यामुळे त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात न्यावे लागले. या सामन्यात ते पुढे सहभागी होऊ शकेल की नाही हे स्कॅननंतर कळेल.
अश्या स्थितीत चौथ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रासाठी जोश हेझलवूड उपलब्ध होणार नाही. दुसऱ्या सत्रात तो गोलंदाजी करताना दिसणार का? हा एक प्रश्न आहे. जर त्याला गंभीर दुखापत झाली असेल. तर मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांचे महत्त्व लक्षात घेऊन जोश हेझलवूडला या सामन्यातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, हे स्कॅन केल्यानंतरच कळेल. खुद्द क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही माहिती दिली आहे. जोश हेजलवूडने या सामन्यात 6 षटके टाकली असून ज्यात एक विकेट त्याच्या नावावर आहे. त्याने विराट कोहलीला ॲलेक्स कॅरीकरवी झेलबाद केले.
दुखापतीमुळे जोश हेझलवूड ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्याचा भाग नव्हता. त्याच्या जागी स्कॉट बोलंडला संधी देण्यात आली. त्याने चांगली गोलंदाजी केली. असे असूनही जोश हेझलवूडने पुनरागमन केले आणि आता तो जखमी झाला आहे. पर्थ कसोटी सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. जोश हेझलवूड उपलब्ध नसल्यास पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यावर अधिक गोलंदाजी करण्याचे दडपण असेल आणि याशिवाय नॅथन लायॉन आणि मिचेल मार्श यांनाही गोलंदाजी करावी लागेल. मार्शने ॲडलेड आणि ब्रिस्बेनमध्ये फारशी गोलंदाजी केलेली नाही.
हेही वाचा-
SMAT 2024; जेतेपद जिंकणाऱ्या मुंबई संघाला मिळणार इतकी बक्षीस रक्कम
कसोटी फाॅरमॅटमध्ये वेस्ट इंडिजला मिळणार नवा मुख्य प्रशिक्षक..! बोर्डाने केली घोषणा
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी सुरू असतानाच ‘या’ भारतीय खेळाडूने घेतली निवृत्ती…!!!