ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीयेत. भारताविरुद्ध सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला पराभव स्वीकारावा लागला. उभय संघांतील तिसरा सामना 1 मार्चपासून खेळला जाणार असून कर्णधार पॅट कमिन्स या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. ताज्या माहितीनुसार कमिन्स या संपूर्ण भारत दौऱ्यातूनच माघार घेऊ शकतो.
ऑस्ट्रेलियन संघाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) संघासोबत भारत दौऱ्यावर (Australia tour of India) आला, पण अचानक त्याची आईची तब्येत बिघडल्यामुळे तो मायदेशात परतला. कमिन्सच्या आईला अद्यापही बरे नसल्यामुळे कमिन्स मालिकेती तिसऱ्या कसोटीपाठोपाट चौथ्या कसोटूतूनही माघार घेऊ शकतो. दरम्यान, भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील कमिन्सचे प्रदर्शन पाहिले, तर तेदेखील समाधानकारक नव्हते. नागपूरमध्ये पहिल्या कसोटीत कमिन्सने 2 विकेट्स घेतल्या, तर दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत त्याने 1 विकेट घेतली. त्याव्यतिरिक्त कर्णधारात्या रूपात कमिन्सने घेतलेले निर्णय देखील संघासाठी काही खास फायद्याचे ठरले नाहीत.
उभय संघांतील तिसरा कसोटी सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर 1 मार्च रोजी सुरू होणार आहे. या सामन्यात कमिन्सने आधीच माघार घेतल्यामुळे स्टीव स्मिथ (Steve Smith) कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. अशात जर कमिन्सने चौथ्या कसोटीतून माघार घेतली, तर त्याला स्मिथलाच कर्णदाराची भूमिका पार पाडावा लागू शकते. या दौऱ्यातील ऑस्ट्रेलियाचे आतापर्यंतचे प्रदर्शन पाहिले, तर ते खूपच निराशाजनक आहे. नागपूर आणि दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाज फिरकी गोलंदाजांपुढे गुडघे टेकताना दिसले. पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला, तर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने मात दिली. हे दोन्ही कसोटी सामने प्रत्येकी तीन-तीन दिवसात निकाली निघाले.
मिचेल स्टार आणि कॅमरून ग्रीन यांचे सागत पुनरागमन होणार
दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी एक चांगील बातमीही समोर येत आहे. त्याचा वेगवान गोलंदाज मिचेस स्टार्क आणि अष्टपैलू कॅमरून ग्रीन तिसऱ्या कसोटीसाठी पूर्णपणे फिट आहे. अशात भारतीय संघाकडून या दोघांच्या रूपात नवीन आव्हान असणार आहे. तसेच सलामीवीर डेविड वॉर्नर दुखापतीमुळे मायदेशात परतल्यानंतर उस्मान ख्वाजासोबत ट्रेविस हेड भारताच्या डावाची सुरुवात करू शकतो. (Australia captain Pat Cummins may withdraw his name from full India tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहचे करियर धोक्यात! आता आयपीएल खेळण्यावरही प्रश्नचिन्ह, WTC फायनलसाठी राहणार अनुपलब्ध?
क्रिकेट जगताची ‘क्वीन’! लॅनिंगने कर्णधार म्हणून जिंकला पाचवा वर्ल्डकप, पुरुष क्रिकेटमध्ये हे आहेत…