कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. हा व्हायरस वेगाने पसरत आहे. या व्हायरसमुळे हजारो लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे इतर देशांतील कोरोना बाधित व्यक्ती आपल्या देशात येऊ नये म्हणून अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केला आहे.
असाच निर्णय ऑस्ट्रेलिया (Australia) सरकारने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने पुढील ६ महिन्यांसाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे याचा भारताच्या आगामी दौऱ्यावर परिणाम होऊ शकतो. यावर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (Tour of Australia) ऑक्टोबर महिन्यात टी२० तिरंगी मालिकेने सुरु होऊन डिसेंबरमध्ये कसोटी सामन्याने संपणार होता. या दरम्यान १८ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. परंतु कोरोनाच्या रूपातील जागतिक संकटामुळे या टी२० विश्वचषकावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये २००० पेक्षा अधिक लोकांंना कोविड-१९ या व्हायरसची लागण झाली आहे. तर १६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने देशाची सीमा बंद केल्या आहेत.
या व्हायरसमुळे (Corona Virus) बीसीसीआयला पर्यायी योजनेचा वापर करावा लागू शकतो. सध्या बीसीसीआयला (BCCI) आयपीएलच्या आयोजनावर निर्णय घ्यायचा आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वेळापत्रकही चिंतेचा विषय आहे. कारण या वेळापत्रकात श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी२०, झिम्बाब्वे दौरा, आशिया चषक टी२० आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल सांगायचं झालं तर पुढील ६ महिन्यांसाठी होणाऱ्या स्पर्धांसाठी कोणत्याही संघाला ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश मिळणार नाही. यामध्ये टी२० विश्वचषक आणि भारतीय संघाच्या दौऱ्याचाही समावेश आहे.
याची माहिती देणाऱ्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “सध्या काहीही सांगणे चूकीचे ठरेल. कदाचित ही ६ महिन्यांची बंदी आहे. जर परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले तर हा वेळ कमी केला जाऊ शकतो.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-२००८ विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील खेळाडू सध्या आहेत तरी कुठे?
-एक नाही दोन नाही तर सगळ्या संघालाच जेव्हा दिली होती मॅन ऑफ द मॅच
-वय वर्ष १६ असलेल्या क्रिकेटरने कोरोनाविरुद्धच्या लढाईत केली एवढ्या लाखाची मदत