गुरुवारी (दि. 08 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद होत 469 धावा उभ्या केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला संघर्ष करावा लागला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 5 बाद 151 धावा बनवल्या होत्या. भारतीय फलंदाजांविरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची रणनीती अगदी योग्य सिद्ध झाली. या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने मागील दोन महिन्यांपासून तयारी सुरू केलेली.
मार्च महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार हे निश्चित झाले होते. भारतीय खेळाडूंनी यानंतर दोन महिने आयपीएलमध्ये आपल्या खेळाचे कौशल्य दाखवले. मात्र, त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेत या अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रित केलेले.
ऑस्ट्रेलियन संघाचे प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ व मार्नस लॅब्युशेन यांनी या परिस्थितीशी एकरूप होण्यासाठी इंग्लिश काउंटी क्लबची वाट धरली. स्मिथने ससेक्स व लॅब्युशेनने ग्लॅमॉर्गन संघांचे प्रतिनिधित्व केले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज कर्णधार पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क यांनी यापूर्वीच आयपीएल लिलावातच सहभाग नोंदवला नव्हता. तर स्कॉट बोलॅंड याला आयपीएल करार नसल्याचा फायदा झाला व तो अधिक काळ सराव करू शकला. एप्रिल व मे महिन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे एक सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये भारतीय फलंदाजांच्या कमजोरीवर काम केले गेले.
या अंतिम सामन्यात भारतीय टॉप ऑर्डरची कमजोरी या सर्व गोलंदाजांनी हेरली. कमिन्सने रोहितला आत येणाऱ्या चेंडूवर पायचित केले. तर, गिल व पुजारा हे चेंडूची दिशा समजू न शकल्याने त्रिफळाचीच झाले. विराटला स्टार्कने एका अप्रतिम उसळी घेणाऱ्या चेंडूने तंबूचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची ही योजना दोन दिवस यशस्वी झाली असली तरी, भारतीय संघाला यातून मार्ग काढावा लागेल.
(Australia Cricket Team Planning For WTC Final In April Are Worked Indian Players Participate In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
ऑस्ट्रेलियाला हरवायचे असेल तर भारतीय संघाला दाखवावी लागेल 20 वर्षांपुर्वीची जादू… वाचा सविस्तर