अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज(7 डिसेंबर) दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीची विकेट गेल्याने भारताचा पहिला डाव सर्वबाद 250 धावांवर आटोपला आहे.
त्यामुळे नंतर फलंदाजीला उतरलेल्या आॅस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 27 षटकात 2 बाद 57 धावा केल्या आहेत. आॅस्ट्रेलियाकडून आज सलामीला अॅरॉन फिंच आणि या सामन्यातून पदार्पण करणारा मार्क्यूस हॅरीस फलंदाजी करण्यासाठी आले .
पण पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने फिंचला त्रिफळाचीत करत भारताला पहिले यश लवकर मिळवून दिले. मात्र त्यानंतर हॅरीस आणि उस्मान ख्वाजाने सावध खेळ करत आॅस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
परंतू ही भागीदारी 44 धावांची झालेली असतानाच आर अश्विनच्या गोलंदाजीवर युवा फलंदाज हॅरीस 26 धावांवर बाद झाला. हॅरीसचा झेल सिली पॉइंटला उभ्या असणाऱ्या मुरली विजयने घेतला.
त्यानंतर शॉन मार्श फलंदाजीला उतरला असून तो ख्वाजाला साथ देत आहे. पहिले सत्र संपले तेव्हा मार्श 1 आणि ख्वाजा 21 धावांवर नाबाद खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–कसोटीमध्ये तब्बल ८२ वर्षानंतर घडला हा पराक्रम
–कसोटीत या गोलंदाजाने रोहित शर्माची घेतली आहे सर्वाधिक वेळा विकेट
–तीन धावांवर बाद होऊनही कर्णधार कोहलीने केला हा खास पराक्रम