क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकांसाठी १८ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ गुरुवारी(२९ ऑक्टोबर) जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्त्व ऍरॉन फिंचकडे कायम ठेवण्यात आले असून मॉझेस हेन्रींक्सचे संघात पुनरागमन झाले आहे.
भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाला जाणार असून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ टी२०, ३ वनडे व ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील वनडे व टी२० मालिकांसाठी ही संघनिवड झाली आहे. भारतीय संघाने शनिवारीच आपल्या तीनही संघाची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद ऍरॉन फिंचकडेच सोपवण्यात आले आहे. तसेच या संघात मार्नस लॅब्यूशेन, स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर अशा फलंदाजांचा अपेक्षेप्रमाणे समावेश करण्यात आला आहे. पॅट कमिन्स, जोश हेझलवुड, मिशेल स्टार्क असे वेगवान गोलंदाज संघात आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या या संघात मॉझेस हेन्रींक्सचे पुनरागमन झाले असून कॅमेरॉन ग्रीनला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. या दोघांनाही मिशेल मार्शऐवजी संघात संधी मिळाली आहे. मार्शला आयपीएलमध्ये खेळताना दुखापत झाली होती.
हेन्रीक्सने मागील आठवड्याच शिल्ड स्पर्धेत १६७ धावांची खेळी केली होती. तसेच सिडनी सिक्सर्सकडून खेळताना मागील हंगामात त्याने जवळपास १५० च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या आहेत.
याशिवाय ऑस्ट्रेलिया संघातून नॅथन लायन, जॉस फिलिप, रिली मेरेडीथ आणि अँड्र्यू टाय यांना वगळण्यात आले आहे. त्यांचा सप्टेंबरमध्ये इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश होता.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिल्यांदा वनडे मालिका खेळवली जाईल. वनडे सामने २७ नोव्हेंबर,२९ नोव्हेंबर आणि २ डिसेंबर रोजी खेळले जातील. त्यानंतर तीन टी२० सामने होतील. तीन टी२० सामने ४, ६ आणि ८ डिसेंबर रोजी खेळले जातील. मर्यादीत षटकांच्या मालिकांनंतर कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून सुरु होईल.
ऑस्ट्रेलिया संघ: ऍरॉन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवुड, मोसेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झांपा.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांचे वेळापत्रक
वनडे मालिका
पहिला वनडे – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वनडे – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वनडे – २ डिसेंबर – कॅनबेरा
टी२० मालिका
पहिला टी२० – ४ डिसेंबर – कॅनबेरा
दुसरा टी२० – ६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी२० – ८ डिसेंबर – सिडनी
कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर – ऍडिलेड
दुसरा कसोटी सामना – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ७ जानेवारी ते ११ जानेवारी – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ जानेवारी ते १९ जानेवारी – ब्रिस्बेन
महत्त्वाच्या बातम्या –
-चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! भारत-ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सामन्याचा घेऊ शकतात प्रत्यक्ष आनंद
-ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच टीम इंडियाच टेन्शन वाढलं ; ‘या’ व्यक्तीला झाली कोरोनाची लागण
ट्रेंडिंग लेख-
-Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
-SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर
-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय