---Advertisement---

असा एक सल्ला ज्याने स्टिव स्मिथचे आयुष्यचं टाकले बदलून

On: रविवार, मार्च 29, 2020 11:02 AM
---Advertisement---

क्रिकेट जगतात क्रिकेटपटूंंनी चांगली कामगिरी करावी यासाठी दिग्गज खेळाडू, प्रशिक्षक किंवा आजी-माजी खेळाडूंकडून सल्ले दिले जातात. यानंतर खेळाडूंमध्ये खरोखरच बदल पहायला मिळतो. अशाच प्रकारचा सल्ला ऑस्ट्रेलियाचा उत्कृष्ट फलंदाज स्टिव्ह स्मिथला मिळाला होता. यानंतर त्याने तो अंमलात आणून चमकदार कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू जॉर्ज बेलीने (George Bailey) स्मिथला मोलाचा सल्ला दिला होता. तसेच त्याने असा अंदाज वर्तविला होता की, स्मिथ असा फलंदाज आहे, जो ५० षटकांच्या सामन्यात आपला डाव सांभाळू शकतो. त्यामुळे त्याने वरच्या फळीत खेळले पाहिजे.

स्मिथ (Steve Smith) २०१५च्या वनडे विश्वचषकापूर्वी साधारणपणे खालच्या फळीत फलंदाजी करत होता. परंतु जेव्हा त्याने फलंदाजीचा क्रम बदलला त्यावेळी त्याचे वेगळेच रुप पहायला मिळाले.

याबद्दल बोलताना स्वत: बेली म्हणाला की, “आम्ही झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) स्मिथला सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवले होते. त्या ३ सामन्यांमध्ये आम्ही मिचेल मार्शला (Mitchell Marsh) वरच्या फळीत खेळवले होते. तेव्हा मी स्मिथला सल्ला (Advice) दिला की, त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे.”

“मी त्यावेळी म्हणालो होतो की, मार्श ५० षटके फलंदाजी करू शकत नाही. परंतु हे काम स्मिथ चांगल्या प्रकारे करू शकतो. मार्शचा फायदा आपल्याला शेवटच्या षटकांमध्ये होईल. माझा हा सल्ला स्मिथने ऐकला. त्याचा फायदा स्मिथला विश्वचषकात झाला,” असेही बेली यावेळी म्हणाला.

विशेष म्हणजे स्मिथने २०१५च्या या विश्वचषकात ८ सामने खेळले होते. यामध्ये त्याने ६७ च्या सरासरीने ४०२ धावा केल्या होत्या. यामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता. इतकेच नव्हे तर, या विश्वचषकात स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. तसेच न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभूत करत ऑस्ट्रेलियाने हा विश्वचषकही जिंकला होता.

ट्रेंडिंग घडामोडी-

-टी२०मध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच ठरलेले ५ खेळाडू

-टाॅप ५- क्रिकेटमध्ये ट्वेंटी२० कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू, एकही भारतीयाचे नाव नाही यात

-तुम्हाला लाज वाटली पाहिजे- धोनीची पत्नी साक्षी कडाडली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---