जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने असणार आहेत. मात्र, त्या आधीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड या अंतिम सामन्यातून बाहेर पडला असून, त्याची जागा मायकल नेसर हा घेईल.
हेजलवूड बऱ्याच कालावधीपासून टाचेच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. याच कारणाने त्याने भारताविरुद्धची कसोटी मालिका खेळली नव्हती. त्यानंतर आयपीएलमध्ये तो दुसऱ्या सत्रात सहभागी झाला. तिथे देखील मोजकेच सामने खेळून त्याने माघार घेतली होती. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आलेले. मात्र, आता तो स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
ऑस्ट्रेलियाला 16 जून पासून इंग्लंडमध्येच प्रतिष्ठेची ऍशेस मालिका खेळायची आहे. त्या मालिकेसाठी पूर्ण तंदुरुस्त होण्याकरिता हेजलवूड याला विश्रांती दिली गेल्याचे सांगण्यात आले आहे. आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलिया संघात मायकेल नेसर याचा समावेश केला गेला आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर
(Australia Pacer Josh Hazlewood Ruled Out From WTC Final Against India Michael Nesser Replace Him)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ एका फोनमुळे हुकलं होतं सेहवागचं पदार्पण, नाहीतर शारजाहमध्ये आलं असतं वादळ
खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एकाधिकारशाही आयपीएलमुळे संपली! डब्ल्यूटीसी फायनलआधी पॅट कमिन्सचे मोठे भाष्य