जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध कसोटी मालिका म्हणून ओळखली जाणारी ऍशेस मालिका (Ashes 2021-2022) सध्या सुरू आहे. ऑस्ट्रेलिया यावर्षी या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असून, त्यांनी यजमानांना साजेशी कामगिरी केली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात यजमानांनी मोठे विजय मिळवले. मालिकेतील तिसरा सामना रविवारपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) सुरू होईल. या बॉक्सिंग डे कसोटीसाठी (Boxing Day Test) यजमान ऑस्ट्रेलियाने एक दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. (Australia XI For Boxing Day Test)
ऑस्ट्रेलिया संघात एक बदल
ब्रिस्बेन आणि ऍडिलेड कसोटी जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० अशी महत्त्वाची आघाडी घेतली आहे. बॉक्सिंग डे कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे, इंग्लंड संघ पहिल्या दोन पराभवातून धडा घेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी आपल्या संघात तब्बल चार बदल केले आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने दोन मात्र निर्णायक एक बदल केले. दुसऱ्या सामन्याला मुकलेला नियमित कर्णधार पॅट कमिन्स या सामन्यातून पुनरागमन करेल. त्यामुळे, दुसऱ्या कसोटीत शानदार कामगिरी करूनही झाय रिचर्डसन त्याला संघाबाहेर बसावे लागणार आहे. तसेच, मायकल नेसर याच्या जागी वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड (Scott Boland Test Debute) याला पदार्पणाची संधी देण्यात येईल.
ऑस्ट्रेलियाची मालिकेत आघाडी
ब्रिस्बेन येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर, ऍडिलेड येथील दुसऱ्या दिवस-रात्र कसोटीत त्यांनी तब्बल २७५ धावांनी विजय साकार केलेला. ऑस्ट्रेलियाचे सर्व फलंदाज व गोलंदाजी यांनी या दोन्ही विजयात समान योगदान दिले आहे.
मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ-
डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरीस, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), ट्रेविस हेड, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड व नॅथन लायन.
महत्त्वाच्या बातम्या-
रहाणे, अय्यर की विहारी? कोण खेळणार पाचव्या क्रमांकावर? उपकर्णधार राहूलने केला खुलासा (mahasports.in)