भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी भारताला हा सामना जिंकण्यासाठी 375 धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाकडून फिंच आणि स्टिव्ह स्मिथने शतके ठोकली.
या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या डावातील काही महत्त्वाचे अपडेट्स –
• डावखुरा फलंदाज डेविड वॉर्नर आणि कर्णधार ऍरॉन फिंच सलामीला फलंदाजीसाठी आले. या दोघांनीही डावाची उत्तम सुरुवात केली. वॉर्नर आणि फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. डेविड वॉर्नर 69 धावा करून तंबूत परतला.
• वार्नर बाद झाल्यावर फिंचने स्टीव्ह स्मिथसह डाव सांभाळला. फिंचने त्याच्या कारकिर्दीतील 17 वे षटक पूर्ण केले. तो 114 धावा करून तंबूत परतला.
• स्टीव्ह स्मिथने आक्रमक फलंदाजी करताना अवघ्या 66 चेंडूत 105 धावा केल्या.
•ग्लेन मॅक्सवेलनेही त्याच्या फलंदाजीचा तडाखा देताना 19 चेंडूत 45 धावांची खेळी केली.
• स्मिथ आणि फिंच या दोन फलंदाजांनी केलेल्या शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 374 धावा केल्या.
• ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध वनडे सामन्यात केलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे.
• भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी घेतले. त्याने वार्नर स्मिथ आणि मॅक्सवेल या महत्वाच्या फलंदाजांना तंबूत पाठवले.
• भारताचे वेगवान गोलंदाज बुमराह आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
• फिरकीपटू युजवेंद्र चहलाही एक गडी बाद करण्यात यश आलं.
महत्त्वाच्या बातम्या –
“त्याच्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही”, रोहितच्या अनुपस्थितीबाबत विराटचे मोठे विधान
बुमराहने यावर्षी घेतली फक्त एक विकेट, बाद होणाऱ्या फलंदाजाचे नाव एकूण वाटेल आश्चर्य
कांगारूंच्या कर्णधाराची पहिल्याच सामन्यात छाप; सलामीच्या शतकासह अनेक विक्रमांना गवसणी