ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यादरम्यान प्रतिष्ठित ऍशेस (Ashes) मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारी (१६ डिसेंबर) ऍडीलेड (Adelaide Day-Night Test) येथे सुरुवात झाली. यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी शानदार खेळ केला. अनुभवी डेव्हिड वॉर्नर (David Warner) व मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuchange) यांच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच केली आहे. मात्र, पहिल्या दिवशीच्या अखेरच्या सत्रातील ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ याचा एक व्हिडिओ तुफान (Steve Smith Funny Video) व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओ?
डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर या सामन्यात नेतृत्व करत असलेला स्टीव्ह स्मिथ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करण्यास सुरुवात केली. दिवसातील अखेरच्या सत्रात फलंदाजी करत असताना इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचा एक चेंडू त्याने अशा काही पद्धतीने खेळला की, सर्व चाहते हसून लोटपोट झाले. अँडरसन याच्या या चेंडूवर त्याने एकही धाव घेतली नाही. मात्र, लॅब्युशेन याला धाव न घेण्याचा इशारा करताना त्याने, जे विचित्र हावभाव केले ते मजेदार होते. स्मिथ यापूर्वीदेखील अशाप्रकारे मैदानावर मजेदार हावभाव करताना दिसून आला आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील त्याचे हे भाव प्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्सन याच्याशी मिळतेजुळते आहेत.
https://twitter.com/fulloftypos_/status/1471477200041828353?t=7lER2cOv4GpeRKOm2rY5Zg&s=19
ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी
दिवस-रात्र स्वरूपाच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स या सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथ (Captain Steve Smith) त्याच्याकडे नेतृत्व देण्यात आले. मार्कस हॅरीस लवकर बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मार्नस लॅब्युशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १७२ धावांची भागीदारी केली. वॉर्नर सलग दुसऱ्या सामन्यात शतकापासून वंचित राहिला. त्याला ९५ धावांवर बेन स्टोक्सने बाद केले. वॉर्नर बाद झाल्यानंतरही लॅब्युशेनने आपला खेळ सुरू ठेवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने २ बाद २२१ धावा केल्या आहेत. लॅब्युशेन नाबाद ९५ तर कर्णधार स्मिथ १८ धावांवर खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२०तील एकाहून एक मातब्बर फलंदाजांना पुरून उरला पाकिस्तानचा रिझवान, केला ‘हा’ विश्वविक्रम