सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दरम्यान दोन्ही संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने 295 धावांनी ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. आता दुसरा कसोटी सामना (6 ते 10 नोव्बेंबर) दरम्यान ॲडेलेडच्या मैदानावर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नाथन लायनने (Nathan Lyon) भारतीय खेळाडूंबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
दुसऱ्या दिवस-रात्र कसोटीपूर्वी नाथन लायन (Nathan Lyon) म्हणाला की, “जेव्हा मी भारतीय संघाकडे पाहतो तेव्हा तो सुपरस्टार खेळाडूंनी भरलेला संघ दिसतो. मात्र क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यामध्ये जिंकण्यासाठी संपूर्ण संघाला चांगली कामगिरी करावी लागते. भारतीय संघात जसप्रीत बुमराह, विराट कोहलीसह इतर काही अपवादात्मक खेळाडू आहेत, परंतु हे केवळ महान खेळाडूंबद्दल नाही.”
पुढे बोलताना लायन म्हणाला, “भारतीय संघाचे उर्वरित खेळाडू देखील आश्चर्यकारकपणे प्रतिभावान आहेत. तो एक महान क्रिकेट संघ आहे. आम्ही फक्त एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करत नाही. शुक्रवारी मैदानात उतरणाऱ्या प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूचा आम्हाला आदर असेल. याचा अर्थ असा नाही की, आम्ही स्पर्धा करणार नाही. आम्ही त्यांचा आदर करतो, परंतु आमची क्रिकेट शैली खेळण्याचा आणि एका महान संघाविरूद्ध कठोर स्पर्धा करण्याचा आमचा निर्धार आहे. भारत हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs PAK; काही तासातच रंगणार फायनलचा थरार! कधी आणि कुठे पाहायचा सामना
अंडर 19 खेळाडूत दिसली एमएस धोनीची झलक! अप्रतिम ‘नो-लूक’ थ्रो चा व्हिडिओ व्हायरल
पदार्पण करताच नशीब चमकले; 21 वर्षाचा स्टार खेळाडू पहिल्या कसोटीनंतरच केंद्रीय करारात सामील