आगामी 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत यावेळी एकूण पाच कसोटी सामने खेळवले जाणार असून, त्यासाठी ऑस्ट्रेलियाने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात व्यस्त असल्याचे दिसते आहे.
सध्या ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. त्यातील एक सामना आधीच झाला आहे. एकदिवसीय सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात टी20 मालिकाही खेळवली जाणार आहे. जी 18 नोव्हेंबरला संपणार आहे. अशा परिस्थितीत 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे अवघे काही दिवस शिल्लक आहेत.
हे लक्षात घेऊन क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आधीच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या काही खेळाडूंना पाकिस्तान मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये कर्णधार पॅट कमिन्सचा समावेश होता.
कमिन्स व्यतिरिक्त मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ हे पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात आणि त्यानंतरच्या टी20 मालिकेत भाग घेणार नाहीत.
यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिस याला पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय आणि त्यानंतरच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनवण्यात आले. इंग्लिश वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा 30 वा आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 14 वा कर्णधार बनेल.
पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार – पहिले दोन सामने), जोश इंग्लिस, (कर्णधार – शेवटचा सामना), शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट (केवळ तिसरा सामना), कूपर कॉनोली, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, जोश हेझलवूड (केवळ दुसरा सामना), स्पेन्सर जॉन्सन (फक्त तिसरा सामना), मार्नस लॅबुशेन (फक्त पहिले दोन सामने), ग्लेन मॅक्सवेल, लान्स मॉरिस, जोश फिलिप (फक्त तिसरा सामना), मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (फक्त पहिले दोन सामने), मिचेल स्टार्क (फक्त पहिले दोन सामने), मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा
पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ
जोश इंग्लिस (कर्णधार), शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा
हेही वाचा-
भारतानं 2036 ऑलिम्पिकसाठी ठोकला दावा, गुजरातमधील या शहराला मिळू शकतं
SA VS IND; 6 षटकार आणि विश्वविक्रम, पहिल्याच टी20 मध्ये कर्णधार सूर्याकडे इतिहास रचण्याची संधी!
700 टेस्ट विकेट्स घेणारा दिग्गज पहिल्यांदाच आयपीएलच्या रिंगणात, मुळ किंमत जाणून व्हाल थक्क!