---Advertisement---

WTC फायनलमध्ये कागिसो रबाडाचा कहर! 5 विकेट्स घेत कांगारूंची मोडली कंबर!

On: बुधवार, जून 11, 2025 9:33 PM
---Advertisement---

AUS vs SA WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त 212 धावांवर आटोपला. दरम्यान एकूण 5 विकेट्स घेणाऱ्या कागिसो रबाडाच्या तुलनेत कांगारू संघाचे फलंदाज काहीच करू शकले नाहीत. रबाडा आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात 5 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या अष्टपैलू ब्यू वेबस्टरने 72 धावा केल्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25च्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टाॅस जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचरण केले. कांगारू संघाची सुरुवात खूपच खराब झाली कारण 67 धावांच्या अंतराने 4 विकेट्स पडल्या. उस्मान ख्वाजा खातेही उघडू शकला नाही, तर ट्रॅव्हिस हेड अवघ्या 11 धावा काढून बाद झाला. स्टीव्ह स्मिथ आणि ब्यू वेबस्टरने 79 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला संकटातून वाचवले. 66 धावा करून स्मिथ बाद झाला.

अ‍ॅलेक्स कॅरीला सुरुवात मिळाली, पण तो 23 धावांचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टर एका मजबूत खडकासारखा क्रीजवर उभा राहिला, पण 72 धावांवर बाद झाला. एकेकाळी ऑस्ट्रेलियाने 5 विकेट गमावत 192 धावा केल्या होत्या, पण पुढच्या 20 धावांत ऑस्ट्रेलियाने शेवटचे 5 विकेट्स गमावले.

कागिसो रबाडाने उस्मान ख्वाजाला शून्य धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. रबाडाने सलग एकामागून 1 विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट्स घेतल्या, त्यापैकी त्याने 2 क्लिन बोल्ड केले. रबाडाने उस्मान ख्वाजा, कॅमरन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्क यांच्या विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मार्को जॅन्सेननेही त्याच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर 3 विकेट घेतल्या. त्याच वेळी, एडेन मार्करम आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---