---Advertisement---

एकाच जागी, एकाच ओव्हरमध्ये ६ षटकार मारणारा १९ वर्षीय युवराज सिंग, पहा व्हिडीओ…

---Advertisement---

अॅडलेडमध्ये क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील पुरुष नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत 18 वर्षीय युवा फलंदाज आॅलीवर डेव्हीसने एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. याबरोबरच त्याने द्विशतकही साजरे केले आहे.

आॅलीवरने या स्पर्धेत न्यू साऊथ वेल्स मेट्रो संघाचे नेतृत्व करताना नॉर्थन टेरेटरी विरुद्ध 115 चेंडूत 207 धावांंची तुफानी खेळी केली आहे. या खेळीत त्याने तब्बल 17 षटकार मारले आहेत. यातील 6 षटकार तर एकाच षटकात त्याने मारले.

त्याने डाव्याच्या 40 व्या षटकात आॅफ स्पिनर जॅक जेम्सच्या गोलंदाजीवर हे सहा षटकार मारले. विशेष म्हणजे हे सर्व सहा षटकार त्याने एकाच ठिकाणी मिडविकेटच्या वर मारले.

त्याने त्याच्या या खेळीत 14 चौकारही मारले आहेत. तसेच द्विशतक करताना पहिल्या 100 धावा 74 चेंडूत तर नंतरच्या 100 धावा 39 चेंडूमध्ये पूर्ण केले. तसेच त्याने सॅम्यूअल फॅनिंगबरोबर 271 धावांची भागीदारीही रचली आहे. तसेच आॅलीवरने केलेल्या 207 धावा या स्पर्धेतील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याही ठरली आहे.

याबद्दल बोलताना आॅलीवर म्हणाला, “पहिल्या दोन षटकारांनंतर माझ्या डोक्यात ही कल्पना आली होती आणि ती शेवटी पूर्ण झाली.

मी फॉरवर्ड स्केअर ते काउ कॉर्नर हा एकच ठिकाणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच चेंडू टाकण्याआधीच मी बॅक लेगला वजन टाकून मिडविकेटवर स्लोग स्विप मारण्याचा प्रयत्न केला.’

त्याच्या या खेळीच्या जोरावर त्याच्या न्यू साऊथ वेल्स मेट्रो संघाने 4 बाद 406 धावा केल्या. पण नॉर्थन टेरेटरी संघाचा डाव 238 धावात संपुष्टात आल्याने  न्यू साऊथ वेल्स मेट्रो संघाने हा सामना 168 धावांनीही जिंकला.

याआधी एकाच षटकात 6 षटकार मारण्याचा कारनामा सर गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्षल गिब्स, युवराज सिंग आणि रॉस व्हिटली यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहली त्या कॅप्शनमुळे झाला सोशल मीडियावर ट्रोल

कसोटी मालिकेत आर अश्विन आहे टिम इंडियाचे महत्त्वाचे अस्त्र

भारतीय फलंदाजांसाठी आॅस्ट्रेलियाचा हा गोलंदाज ठरू शकतो मोठा धोका

अॅडलेड कसोटीत टिम इंडियाकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी आहेत या चार खेळाडूंचे पर्याय

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment