भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेला 17 डिसेंबर 2020 पासून सुरुवात होईल. या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विल पुकोव्हस्की आणि जो बर्न्स या दोन युवा प्रतिभावान खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र, या दोन खेळाडूंपैकी सलामीला कोणता फलंदाज येईल हे अद्यापही निश्चित नाही. अशातच ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन याने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या शेफील्ड शिल्ड या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत पुकोव्हस्कीने सलग दोन दुहेरी शतक झळकावले आहे. या चमकदार कामगिरीमुळे त्याची भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे तो सलामीवीर म्हणून प्रबळ दावेदार आहे.
पुकोव्हस्कीने शेफील्ड शिल्ड या देशांतर्गत स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली असूनही पेनने संकेत दिले की जो बर्न्सच डेविड वॉर्नरबरोबर डावाची सुरूवात करू शकेल. तो म्हणाला की, “बर्न्सने गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली होती. त्याची आणि वॉर्नरची भागीदारी संघासाठी आवश्यक आहे. गेल्या वर्षी त्याने आम्हाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे बर्न्स किती उपयुक्त आहे हे आपल्याला माहित आहे.”
“कसोटी क्रिकेटमधील त्याची सरासरी 40 च्या जवळपास आहे आणि त्याने डाव सुरू करावा अशी माझी इच्छा आहे.” असेही पुढे बोलताना पेन म्हणाला
माजी कर्णधार मार्क टेलर, इयान चॅपल, मायकेल क्लार्क आणि किम ह्यूजेस यांच्यासह अनेक माजी खेळाडूंनी पुकोस्कीला अॅडिलेड ओव्हल येथे होणाऱ्या कसोटीसाठी संधी देण्याचा सल्ला दिला होता.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि निवड समितीचे अध्यक्ष ट्रेवर होन्स यांनी पुकोव्हस्की आणि बर्न्स यांच्याबद्दल अद्यापही अंतिम निर्णय घेतलेला नाही. 6 डिसेंबर 2020 रोजी भारताविरुद्ध सुरु होणाऱ्या तीन दिवसीय सराव सामन्यात ते कशी कामगिरी करतात याकडे लँगर आणि होन्स यांच लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरणार अनवाणी पायांनी; कारण आहे खूपच कौतुकास्पद
Video: आफ्रिदीची दांडी उडवल्यानंतर गोलंदाजाने जोडले हात; वाचा काय आहे प्रकरण
वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला धक्का; ‘या’ प्रमुख खेळाडूचे खेळणे अनिश्चित
ट्रेंडिंग लेख –
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
‘डेमियन फ्लेमिंग’… पहाट स्वप्न सत्यात उतरलेले पाहिलेला ऑसींचा एकमेव गोलंदाज