ऑस्ट्रेलिया संघ २७ नोव्हेंबरपासून अफगानिस्तानच्या पुरुष संघासोबत कसोटी सामन्याच्या तयारीत होता. पण आता ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेनने म्हटले आहे की, अफगानिस्तानसोबत कसोटी सामना पुढे जाण्याच्या आशंका दिसत नाहीये. कारण तालिबान महिलांना क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी देत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही स्पष्ट केले आहे की, जर अफगानिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंना खेळण्याची परवानगी मिळाली नाही, तर ते अफगानिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याचे यजमानपद भूषवणार नाहीत.
अफगानिस्तानसोबतच्या कसोटी मालिकेआधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी म्हटले की, जर अफगानिस्तानमध्ये महिला क्रिकेटचे समर्थन केले गेले नाही. तर ते अफगानिस्तानसोबत कसोटी मालिकेचे आयोजन करणार नाहीत. तसेच कसोटी कर्णधार टिम पेनने आयसीसीने मौन पाळल्याबाबतही वक्तव्य केले आहे. कारण अफगानिस्तान आगामी टी२० विश्वचषकातही सहभाग घेणार आहे.
टिम पेन रेडिओवर बोलताना म्हणाला, “हॉबर्ट कसोटी सामना खेळणे चांगले नाही वाटत. यात शंका नाही की आपण अडचणीच्या जगात आहोत, मात्र त्याच्या आसपासचा तर्क शक्यतो योग्य आहे. याचे दोन स्तर आहेत. आयसीसीचा त्यातील क्रिकेट पैलू असा आहे की, एक कसोटी खेळणारा संघ बनण्यासाठी तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय महिला संघ असायला हवा. स्पष्ट आहे, तालिबानसोबत सध्या महिलांना कोणताही खेळ खेळण्यास बंदी आहे आणि याचा परिणाम आयसीसी स्तरावर होतो.”
पेन पुढे म्हणाला, “दुसरा एक महिलेच्या दृष्टीने, मानवाधिकारांच्या दृष्टीने आपल्या अर्ध्या लोकसंखेला काहीतरी करण्यापासून दुर करणे योग्य नाहीये. मला नाही वाटत आम्ही या देशांशी संबंध जोडू इच्छितो. जो देश त्याच्या अर्ध्या लोकसंख्येकडून संधी किंवा गोष्टी काढून घेत आहे.”
पेन पुढे म्हणाला, तो हे पाहू शकत नाही की, सध्याच्या परिस्थितीत अफगानिस्तानला आयसीसीच्या स्पर्धेत कशी खेळण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तो म्हणाला, “या मुद्द्यावर आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ऐकले आहे. आम्ही ऑस्ट्रेलियन सरकारकडून ऐकले आहे, आम्ही ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशनकडून ऐकले आहे, पण आतापर्यंत आम्ही आयसीसीकडून काहीच ऐकले नाही. मला वाटते एका महिन्याच्या कालावधीत टी२० विश्वचषक आहे आणि अफगानिस्तान त्याचा भाग आहे.”
त्याचे म्हणणे आहे की, “हे पाहणे मनोरंजक असेल की तेव्हा काय होईल. संघ टी२० विश्वचषकाच्या बाहेर होईल की नाही? मला वाटते की, संघांनी त्यांच्या विरोधात खेळण्यास माघार घेतली आणि सरकारने त्यांना आमच्या देशाचा प्रवास करू दिला नाही. तर हे अशक्य असेल. अशा संघांना आयसीसी कार्यक्रमात खेळण्याची परवानगी कशी काय दिली जाऊ शकते? हे खूप कठीण होणार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
रद्द झालेला इंग्लंड वि. भारत पाचवा कसोटी सामना होणार रिशेड्यूल, पण कधी आणि कोठे होईल मॅच?
फॉर्मात असूनही टी२० विश्वचषकासाठी लागली नाही पृथ्वी शॉची वर्णी, ‘या’ खेळाडूमुळे भंगले स्वप्न