भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांची वनडे मालिका गुरुवारी (22 मार्च) समाप्त झाली. चेन्नई येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाचा 21 धावांनी पराभव करत मालिका खिशात घातली. या पराभवामुळे भारतीय संघाला दुहेरी नुकसान झाले. मागील अनेक काळापासून जागतिक वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला या पराभवामुळे खाली यावे लागले.
उभय संघातील ही तीन सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ जागतिक वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. मायदेशात भारतीय संघ सातत्याने मालिका जिंकत असल्याने सहाजिकच भारतीय संघाला मालिका विजयाचे दावेदार मानले जात होते. मात्र, ऑस्ट्रेलियन संघाने पिछाडीवरून शानदार पुनरागमन करत मालिका आपल्या नावे केली. यामुळे भारतीय संघाला तब्बल 26 मालिकांनंतर मायदेशात पराभूत व्हावे लागले. तसेच क्रमवारीतील अव्वल स्थान देखील भारतीय संघाने गमावले.
We have a new World No.1 🎉
Australia climb to the top of the @MRFWorldwide ICC Men's ODI Team Rankings after the series victory against India 👏
🗒: https://t.co/CXyR2x0PJJ pic.twitter.com/Ujz1xrWpw0
— ICC (@ICC) March 22, 2023
नव्या क्रमवारीनुसार भारत आणि ऑस्ट्रेलियाचे समान 113 गुण असून, दशांश गुणांच्या फरकाने ऑस्ट्रेलिया पुढे आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड व चौथ्या स्थानी इंग्लंडचा संघ दिसून येतो. याच दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाने दोन कसोटी सामन्यातील पराभवानंतर एका सामन्यात विजय व एक सामना अनिर्णीत राखल्याने, आपले कसोटी क्रमवारीतील पहिले स्थान देखील वाचवले होते.
मुंबई येथील पहिला सामना भारतीय संघाने तर विशाखापट्टणम येथील दुसरा सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकल्याने चेन्नई वनडेला महत्त्व प्राप्त झाले होते. ऑस्ट्रेलिया संघाने सर्व फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर 269 धावा उभ्या केलेल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी विराट कोहली व हार्दिक पंड्या यांनी झुंज दिली. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक मालिकाविजय मिळवून दिला.
(Australia Top ICC ODI Rankings India Slips At Two After Chennai Loss)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
या 4 कारणांमुळे 2003 विश्वचषक ठरला जगातील आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ क्रिकेट विश्वचषक
क्रिकेटमध्ये 20 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ दु:खद घटना; बॉथमसोबत तुलना होत असलेल्या 24 वर्षीय खेळाडूने गमावला होता जीव