मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 8 धावा केल्या आहेत. तसेच भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आहे.
त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीवर काही जणांनी टीका केली आहे. काहींचे म्हणणे आहे की विराटने 500 धावा धावफलकावर लागल्यावर डाव घोषित करायला हवा होता. तसेच मैदानावर असलेल्या फलंदाजांना विचारायला हवे होते. तर काहीचे म्हणणे आहे की विराटचा तो निर्णय योग्य होता.
पण आपण खेळपट्टी आणि सामन्यातील भारताची परिस्थितीचा आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा थकवा विचारात घ्यायला हवा.
सध्याच्या मॉर्डन क्रिकेटमध्ये 443 धावा या पुरेशा ठरत नाहीत. अनेकदा संघ 300 पेक्षा अधिक धावा सहज पार करतात. पण या खेळपट्टीवर विशेषत: मेलबर्नसारख्या मोठ्या मैदानात धावा करणे अवघड जाते. त्यामुळे 443 धावा या 500 धावांपेक्षा अधिक धावा करण्यासारखेच आहे.
तसेच विराटने रिषभ पंत आणि रोहित शर्मा फलंदाजी करत असताना आणि डाव घोषित करण्यासाठी काहीवेळ शिल्लक असताना धावांची गती वाढवण्यास सुचवले होते. पण त्यामुळे भारताला विकेट गमावण्याची भिती होती आणि झालेही तसेच. आक्रमक खेळण्याच्या नादात पंत आणि रविंद्र जडेजा बाद झाले. त्यामुळे विराटचा तो निर्णय अयोग्य वाटू शकतो.
पण जडेजा बाद झाल्यानंतर विराटने गोलंदाजांना फलंदाजीला पाठवण्याचा धोका पत्करला नाही. कारण खेळपट्टीवर उसळ असल्याने गोलंदाजांना दुखापत होण्याची शक्यता होती. त्यामुळे हा धोका पत्करणे भारतासाठी त्रासदायक ठरु शकले असते.
तसेच दमलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांची एकतरी विकेट मिळेल ही अपेक्षा भारतीय गोलंदाजांना होती. त्यामुळे भारत दुसऱ्या दिवसाची अखेरची सहा षटके गोलंदाजी करण्यासाठी उतरला. मात्र ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर ऍरॉन फिंच आणि मार्कस हॅरिसने दुसऱ्या दिवसाची सहा षटके खेळून काढताना भारताला यश मिळू दिले नाही.
तसेच चेंडू अजून नवीन असल्याने आणि खेळपट्टी फलंदाजीसाठी आणखी त्रासदायक होणार असल्याने भारताच्या गोलंदाजांना उद्या सकाळी त्याचा फायदा होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या:
–ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मुर्खपणा, म्हणे कोहलीने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी
–याला म्हणतात नशीब! रोहित शर्माबद्दल घडलेला हा किस्सा पहाच
–तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचे ११ पैकी ६ खेळाडू आहेत त्रिशतकवीर