---Advertisement---

‘त्याला’ गोलंदाजी करताना पाहिले आणि तेच करण्याचा प्रयत्न केला, युझवेंद्र चहलचा खुलासा

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 4:22 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारताच्या प्लेयिंग एलेव्हेनमध्ये फिरकीपटू यूझवेंद्र चहलचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, भारताच्या डावादरम्यान अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या डोक्याला चेंडू लागला. त्यामुळे त्याला अस्वस्थ लागल्याने तो दुसऱ्या डावात मैदानात येऊ शकला नाही. त्याच्याजागी ‘कन्कशन सब्स्टिट्यूट’ म्हणून चहलला सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली.

सामन्यानंतर चहलने या सामन्यात खेळण्याबद्दल आणि त्याच्या गोलंदाजीबद्दल भाष्य केले.

मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होतो -चहल

प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळविण्यास अपयशी ठरल्यानंतर ‘कन्कशन सब्स्टिट्यूट’ म्हणून मैदानात उतरला तेव्हा चहलवर कोणताही दबाव नव्हता. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “जेव्हा आम्ही फलंदाजी करत होतो, तेव्हा माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. त्यानंतर अचानक मला कळाले की, मी खेळणार आहे. बऱ्याच सामन्यात खेळण्याचा मला अनुभव आहे. त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होतो.”

गोलंदाजीबद्दल झाम्पाकडून शिकलो

ऑस्ट्रेलियामधील खेळपट्ट्यांवर चांगली गोलंदाजी कशी करावी याविषयी प्रतिस्पर्धी संघाचा फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पाकडून चहलने काही गोष्टी शिकल्या. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी वनडे सामन्यात केलेल्या चुकांपासुन बरेच काही शिकलो. वनडे सामन्यात मी चेंडू फ्लाईट करत होतो. परंतु मी झाम्पला गोलंदाजी करताना पाहिले. तो ज्या प्रकारे गोलंदाजी करतो, तेच करण्याचा प्रयत्न मी केला.”

योजनेनुसार केली गोलंदाजी

“पहिल्या डावात धावा काढणे थोडे कठीण होते. या खेळपट्टीवर 150 ते 160 ही चांगली धावसंख्या होती. मी माझ्या योजनेनुसार गोलंदाजी केली.”असेही पुढे बोलताना चहल म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या –

दुसऱ्या टी२० सामन्यात अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन, ‘हा’ खेळाडू ठरू शकतो ‘ट्रम्प कार्ड’

‘रवींद्र जडेजाच्या कन्कशन प्रकरणात नियमांचे झाले उल्लंघन’, भारतीय दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

‘तो पनवती आहे’, विराटची प्रशंसा केल्याने माजी भारतीय कर्णधाराला चाहत्यांनी धरले धारेवर

ट्रेंडिंग लेख –

…म्हणून पुण्यात २० वर्षांपूर्वी झालेला ‘तो’ सामना सचिन तेंडुलकरसाठी ठरला खास

‘कन्कशन सब्सटिट्यूट’ म्हणजे नक्की काय रे भाऊ?

पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---