वर्ल्डकप काउंटडाऊनच्या आपल्या खास मालिकेत तिसऱ्या अंकाची मानकरी ठरत आहे आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा विश्वचषक आपल्या नावे केलेली ऑस्ट्रेलिया. आतापर्यंत बारा वेळा पार पडलेल्या या विश्वचषक स्पर्धेच्या महासंग्रामात तब्बल पाच वेळा ऑस्ट्रेलियाने विश्वचषक आपल्या घरी नेला आहे. त्यातही सलग तीन वेळा त्यांनी ही कामगिरी करून दाखवलेली.
ऑस्ट्रेलियाने सर्वात पहिल्यांदा विश्वचषक आपल्या नावे केला 1987 मध्ये. सर ऍलन बॉर्डर यांच्या नेतृत्वात इंग्लंडला हरवत त्यांनी पहिल्यांदा विश्वविजेते होण्याचा मान मिळवलेला. त्यानंतर त्यांना पुढील विश्वचषक जिंकण्यासाठी बारा वर्षे वाट पाहावी लागली. इंग्लंडमध्ये झालेल्या 1999 विश्वचषकात त्यांनी अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद पटकावले. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व महान स्टीव्ह वॉ याने केलेले.
वॉ याच्या नेतृत्वात नव्याने सुरू झालेली विश्वविजयाची परंपरा रिकी पाँटिंग याने पुढे चालू ठेवली. दक्षिण आफ्रिकेत 2003 मध्ये एकही पराभव न स्वीकारता त्यांनी अंतिम सामन्यात भारतीय संघाला एकतर्फी पराभव करत एकूण तिसऱ्यांदा व सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. पुढे चार वर्षांनी 2007 मध्ये त्यांनी याच कामगिरीची पुनरावृत्ती केली. पुन्हा एकदा पराभवाचे तोंड न पाहता अंतिम सामन्यात श्रीलंकेला नमवून त्यांनी वर्ल्डकप विजयाची हॅट्रिक पूर्ण केली.
भारतात 2011 मध्ये विजेतेपद पटकावण्यात त्यांना अपयश आले. मात्र, 2015 ला मायदेशात झालेल्या विश्वचषकात त्यांनी हे अपयश धुवून काढत मायकल क्लार्कच्या नेतृत्वात पाचव्यांदा विश्वचषक नावे केला. 2019 मध्ये त्यांना उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागलेले. यंदा ते विश्वविजयाचा षटकार मारणार का याकडे सर्वांचे लक्ष असेल.
(Australia Won Three Consecutive ODI World Cup 1999, 2003, 2007)
हेही वाचा-
रोहितच्या विस्फोटक फलंदाजीची ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या मनात दहशत, म्हणाला, ‘तो तुमच्याविरुद्ध 20-24…’
विश्वचषकाच्या 5 दिवसांआधी युवराजची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ संघ खेळणार सेमीफायनल, एक नाव हैराण करणारे






