Cameron Green Kidney: ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन याच्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. ग्रीनने स्वत: खुलासा केला आहे की, तो दीर्घ काळापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. आयपीएल 2023 हंगामात मुंबई इंडियन्स संघाने 17.5 कोटी रुपयात खरेदी केलेल्या ग्रीनने सांगितले की, त्याच्या जन्मावेळीच ही भविष्यवाणी केली गेली होती की, तो 12 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही.
ग्रीनला कसला आजार?
कॅमरून ग्रीन (Cameron Green) याच्या जन्मापासूनच क्रोनिक किडनी रोग (Chronic Kidney Disease) हा त्याच्या आयुष्याचा भाग राहिला आहे. त्यामुळे किडनीच्या स्वच्छतेच्या कार्यावर परिणाम झाला आहे. 7 क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत ग्रीनने खुलासा केला की, त्याची किडनी वर्तमानात जवळपास 60 टक्के काम करत आहे. त्यामुळे तो या आजाराच्या दुसऱ्या स्टेजमध्ये आहे.
ग्रीनने 7 क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “जेव्हा माझा जन्म झाला होता, तेव्हा माझ्या आई-वडिलांना सांगण्यात आले होते की, मला क्रोनिक किडनी रोग आहे, ज्याची कोणतीही लक्षणं नाहीत. याविषयी मला अलीकडेच केलेल्या अल्ट्रासाऊंडद्वारे समजले आहे.”
Cameron Green has chronic kidney disease.
– Wishing him for speedy recovery..!! pic.twitter.com/sQ4ffTUa4r
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 14, 2023
त्याने पुढे समजावून सांगत म्हटले की, “मूत्रपिंड चांगले होऊ शकत नाहीत. हे अपरिवर्तनीय आहे. यासाठी प्रगती कमी करण्यासाठी तुम्ही जो काही मार्ग काढू शकता, त्याचा प्रयत्न करत राहा.”
ग्रीनचे वडील गॅरी म्हणाले की, “त्यावेळी हे काही माहिती नव्हते. रोगनिदान फारसे चांगले नव्हते. असं सांगितलं जात होतं की, तो 12 वर्षांपेक्षा जास्त वर्षे जगू शकत नाही.”
याव्यतिरिक्त ग्रीनची आईदेखील व्यक्त झाली. त्यांनी म्हटले की, “हा एक किडनीच्या वाल्वमधील अडथळा होता, ज्यामुळे मूत्र पुन्हा किडनीच्या दिशेने प्रवास करायचे आणि ते नीट विकसित होऊस शकत नव्हते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का होता.”
Cameron Green has chronic kidney disease.
There are five stages to it, with the fifth stage requiring a transplant or dialysis.
This is how Green – currently at stage two – manages the condition every day… pic.twitter.com/ikbIntapdy
— 7Cricket (@7Cricket) December 14, 2023
ग्रीनची कारकीर्द
कॅमरून ग्रीन सध्या 24 वर्षांचा असून त्याने ऑस्ट्रेलियासाठी 24 कसोटी, 23 वनडे आणि 8 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 33.59च्या सरासरीने 1075 धावा, वनडेत 34च्या सरासरीने 442 धावा आणि टी20त 139 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना कसोटीत 30 विकेट्स, वनडेत 16 विकेट्स आणि टी20त 5 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाशी ट्रेड केले आहे. आता ग्रीन मुंबई नाही, तर आरसीबी संघाकडून खेळताना दिसू शकतो. (australian all rounder cameron green is suffering from a dangerous kidney disease)
हेही वाचा-
एकच मारला पण सॉलिड मारला! आफ्रिदीच्या चेंडूवर वॉर्नरने बसून ठोकला अफलातून षटकार, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
वर्ल्डकपच्या 25 दिवसांनंतर शमीचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘Final हारल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये कुणीच कुणाला…’