---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या टी२० स्पेशालिस्टला करायचयं कसोटी संघात पुनरागमन; भारताबद्दल म्हणाला…

---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ खेळाच्या तिन्ही प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतोय. टी२० चे ते विश्वविजेते आहेत. तर वनडेत त्यांच्या संघाने चांगली लय पकडली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्येही त्यांचा संघ दुसऱ्या क्रमांकावर असून, ते अंतिम फेरीच्या दिशेने प्रवास करत आहेत. अशात ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुन्हा एकदा जागा मिळवण्यासाठी अनुभवी ग्लेन मॅक्सवेल तयारी करतोय.

ग्लेन मॅक्सवेल याला टी२० स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाते. तो टी२० क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आलाय. आगामी बिग बॅश लीगमध्ये तो सहभागी होईल. या लीगसाठीच्या ड्राफ्टची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्यावेळी मॅक्सवेलने काही प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने कसोटी संघातील पुनरागमनाबाबत बोलताना अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया देत म्हटले,

“बराच काळ लोटला आहे आणि कसोटी संघात येण्यासाठी मी खूप उत्साही आहे. माझी निवड मला आठवण करून देते की मी कुठे असावे. याबाबत मी कोणतीही गुप्तता पाळलेली नाही. मला पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. या उन्हाळ्याच्या अखेरीस कसोटी संघाचा भाग होण्याची मला आशा आहे.”

मॅक्सवेल याची नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यासाठी कसोटी संघात निवड झाली होती. मात्र, तो दोन्ही सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये आपली जागा बनवू शकला नाही.

भारतात खेळण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल बोलताना तो म्हणाला,

“भारतात मी माझ्या पत्नीपेक्षा जास्त काळ राहिलो आहे. तेथील सर्व परिस्थिती मला माहितीये. भारतातच कसोटी खेळण्यासाठी मी उत्साही आहे.”

मॅक्सवेल याने आपले कसोटी पदार्पण २०१३ मध्ये भारत दौऱ्यावर केले होते. मात्र, तेथून आजपर्यंत केवळ सात कसोटी सामने खेळू शकला आहे. २०१७ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आता आयपीएल तेव्हाच खेळेल, जेव्हा…’; बेन स्टोक्सने केले महत्वाचे विधान
काय गोलंदाजी केलीस भावा? सगळेच फलंदाज शून्यावर बाद, १५ चेंडूत पालटला सामना
नातं तुटल्याच्या चर्चांनंतर एका महिन्यासाठी धनश्री जातेय माहेरी! ऐकून चहलने दिली अशी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---