ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग वाहिनी चॅनल 7 ने ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार चॅनल 7 ने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. चॅनलने क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरत असल्याचा गंभीर आरोप लगावला. बीसीसीआयच्या दबावाखाली भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बदल केले असल्याचेही चॅनल 7 चे म्हणणे आहे.
याबाबत बोलतांना सेवन वेस्ट मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स वॉरबर्टन म्हणाले, “क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या सामन्यांची सुरुवात कसोटी सामन्यांनी करायची होती. मात्र, बीसीसीआयच्या दबावाला बळी पडत त्यांनी मर्यादित षटकांच्या सामन्यांनी दौऱ्याचा प्रारंभ केला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया ज्या पद्धतीने बीसीसीआयच्या तालावर नाचते आहे, ती अतिशय शरमेची बाब आहे.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ अधिकारी बीसीसीआयच्या मर्जीने कारभार करत आहेत. तसेच फॉक्सटेल या आपल्या दुसर्या ब्रॉडकास्टिंग वाहिनीला अधिक झुकतं माप देत असल्याचा आरोपही चॅनल 7 ने केला. चॅनलने दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेबाबत बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि फॉक्सटेल यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील जाणून घेण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.
विराट कोहलीच्या पालकत्व रजेमुळे चॅनल 7 चे नुकसान
भारतीय कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी भारतात परतणार आहे. मात्र, यामुळे चॅनल 7 चे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. चॅनल 7 कडे ४ कसोटी सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क आहेत. मात्र, विराट कोहली त्यातील केवळ एक कसोटी सामना खेळणार आहे. याचा परिणाम प्रक्षेपणावर होऊन चॅनल 7 ला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. याचवेळी चॅनल 7 ची प्रतिस्पर्धी वाहिनी असलेल्या फॉक्सटेल स्पोर्ट्सकडे मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क असल्याने, त्यांचा अधिक फायदा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! पाकिस्तानचा सातवा खेळाडू ‘कोरोना पॉझिटिव्ह’, दौरा रद्द होण्याचे संकट
“पाकिस्तान संघ कोणता क्लब संघ नाही” शोएब अख्तर न्यूझीलंडवर कडाडला
ट्रेंडिंग लेख-
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
‘हा’ विक्रम करत कोहलीने धोनीलाही टाकले मागे, दिग्गज कर्णधारांच्या पंक्तीत मिळविले स्थान