बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये सलग दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स कसोटी मालिकेतील अजून दोन सामने बाकी असताना मायदेशात परतला आहे. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये तीन दिवसांच्या आत ऑस्ट्रेलियाने भारतापुढे गुडघे टेकले. अशात मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू होण्याआधी कमिन्स मायदेशात परतल्याने माध्यमांमध्ये याविषयी चर्चा रंगल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीत (Border Gavaskar Trophy) सध्या भारताचे पारडे जड दिसत आहे. भारताने पहिल्या सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 6 विकेट्सच्या अंतराने पराभूत झाला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने बाजी मारल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा संपल्या. ऑस्ट्रेलियाने जरी पुढे दोन सामने जिंकून कसोटी मालिका बरोबरीने सोडवली, तरी बॉर्डर गावसकर ट्रॉफी मात्र गतविजेत्या भारताकडेच राहील. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून धरमशाला याठिकाणी खेळला जाणार होता. पण कसोटीचे आयोजन करण्यासाठी मैदान तयार नसल्यामुळे हा सामना आता इंदोरच्या होळकर स्टेडियवर खेळवला जाईल.
29 वर्षीय पॅट कमिन्स (Pat Cummins) मायदेशात गेला असला, तरी चाहत्यांना तो तिसऱ्या कसोटीसाठी पुन्हा भारतात येण्याच्या अपेक्षा आहेत. वैयक्तिक कारणास्तव कमिन्स मायदेशात चालला असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधील कमिन्सचे प्रदर्शन पाहिले, तर तेदेखील काही खास नव्हते. नागपूर आणि दिल्लीमध्ये खेळताना कमिन्सने एकूण तीन विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर मिचेल स्वेप्सन (Mitchell Swapson) देखील पहिल्यांदाच वडील बनल्याने मायदेशात परतला होता. ऑस्टेलियन संघाने स्वेप्सनची जागा भरण्यासाठी क्विंसलँडचा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुहनेमन याला खेळण्याची संधी दिली. स्वेप्सन तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतात येईल आणि संघासाठी इंदोरमध्ये महत्वाचे योगदान देईल, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियन चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Australian captain Pat Cummins returned home after losing two consecutive Tests)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ दोन कारणांमुळे दिल्लीतही ऑस्ट्रेलियाने गमावला सामना, चूक फलंदाजांचीच!
सौराष्ट्रला रणजी चॅम्पियन बनवण्यानंतर मिळाले मोठी बक्षीस, वेगवान गोलंदाजाचे 10 वर्षांनी संघात पुनरागमन