ऑस्ट्रेलियाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याचा मोठा भाऊ अर्सलान तारिक ख्वाजाला साडे चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. खोटा दहशतवादी कट रचून स्वतःच्या सहकाऱ्याला अडकवण्याच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजा याचा मोठा भाऊ अर्सलान ख्वाजा अडचणीत सापडला आहे. 2018 साली न्यू साऊथ वेल्सचा त्याचा सहकारी निजामदीन याच्या वहीत काही खोट्या परंतु गंभीर गोष्टी त्याने लिहुन ठेवल्या होत्या. एका मैत्रिणी सोबत जवळीक वाढल्याने अर्सलानने हे कृत्य केले होते. या प्रकरणात निजामदीनला आधी अटक करण्यात आली होती आणि प्रसार माध्यमांमध्येही त्याला आतंकवादी घोषित करण्यात आले होते.
पुढे पोलीस तपासात निजामदीनला अडकवले असल्याचे सत्य उघड झाले आणि पोलिसांनी अर्सलानला चौकशीसाठी अटक केली. यादरम्यान त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. 2017 साली प्रेम झाल्याने त्यातूनच हे कृत्य घडले. एका व्यक्ती विरोधात अधिकाऱ्यांमार्फत फोन करून विजा आणि आतंकवादाचा आरोप ठेवला होता.
अर्सलान ख्वाजाने त्या वहीत 22 पानांवर काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. या वहीत तत्कालीन पंतप्रधान मैल्कम टर्नबुल आणि गवर्नर-जनरल त्याचबरोबर पोलीस स्थानकांवर हल्ला करण्याबाबत लिहून ठेवले होते. इतकेच नव्हे तर मेलबर्नमध्ये होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना तसेच इतर ठिकाणीही हल्ला करण्याबाबत लिहून ठेवले होते. मुळात हा कट खोटा होता आणि हे खोटे कट रचून दुसऱ्याला अडकवण्याच्या गुन्ह्याखाली त्याला आता साडे चार वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
पाकिस्तानमध्ये जन्मलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा भावा बद्दल म्हणाला…
उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू असून त्याचा जन्म हा पाकिस्तान येथे झाला आहे. उस्मान ख्वाजाने त्याच्या भावाला शिक्षा ठोठावल्या नंतर म्हटले की, “या घटने पूर्वी तो एक आदर्श नागरिक होता.”
उस्मान ख्वाजा हा 2011 पासून ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळत आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 44 कसोटी सामने तर 40 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-रोहित ‘नो’हिट! आयपीएलमधील अतिशय लाजीरवाणा विक्रम झाला नावावर
ट्रेलब्लेझर्सच्या घातक गोलंदाजीसमोर मिताली राजच्या संघाने टेकले गुडघे; ९ विकेट्सने झाला पराभव
Video: विराटने चक्क तलवारीने कापला केक, पाहा बर्थडे सेलिब्रिशन
ट्रेंडिंग लेख –
आज वाढदिवस असणाऱ्या विराट कोहलीने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!
‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!






