---Advertisement---

हे काय नविनच! ब्रिस्बेन कसोटीदरम्यान स्टार वॉर्सच्या वेशात दिसले दर्शक, फोटो तूफान व्हायरल

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 10:47 AM
---Advertisement---

पहिल्या तीन कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत संघ शुक्रवारपासून (१५ जानेवारी) निर्णायक असा चौथा कसोटी सामना खेळत आहेत. ब्रिस्बेनच्या द गॅबा स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याचा आज (१८ जानेवारी) चौथा दिवस असून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २७५ हून अधिक धावांची आघाडी मिळवली आहे. गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्क नाबाद फलंदाजी करत आहेत. दरम्यान या सामन्यातील दर्शकांच्या एका फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सामना पाहायला आलेले ऑस्ट्रेलियाचे काही दर्शक अजब वेशात दिसून आले. त्यांनी स्टार वॉर्सच्या पात्रांप्रमाणे वस्त्र परिधान केल्याचे दिसत होते. या दर्शकांचा फोटो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आयसीसीने लिहिले आहे की, ‘दुसऱ्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट पोशाखाचा पुरस्कार यांना जातो.’

आयसीसीसने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने अशाप्रकारे तोंड लपवून ते दर्शक भारतीय खेळाडूंना पुन्हा त्रास देण्याची योजना आखत आहेत का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काहींनी कोविड-१९चा प्रसार होऊ नये म्हणून त्यांनी असे कपडे घातले असावे, असा अंदाज वर्तवला आहे.

https://twitter.com/Twittingpravin/status/1350251438199357442?s=20

https://twitter.com/aparachick/status/1350349641338945536?s=20

असे असले तरी, दर्शकांनी अशाप्रकारचे वस्त्र घालण्यामागचा हेतू काय होता?, हे अद्याप उघडकीस आलेले नाही. त्यामुळे सर्वांना यामागील कारण जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : अर्धशतक करुन स्टिव्ह स्मिथ आऊट; ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबुत, ऑस्ट्रेलियाच्या ५५ षटकात ५ बाद १९६ धावा

श्रीलंकाच्या विकेटकीपरने चालू सामन्यात संघ सहकाऱ्याला मारली चापट, सेहवागने घेतली फिरकी

शार्दुल ठाकूर म्हणाला, फलंदाजी करताना रवि शास्त्री यांनी सांगितलेली ‘ही’ गोष्ट होती लक्षात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---