भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघ खेळासह मैदानाबाहेर चालू असलेल्या बाबींमुळे देखील चर्चेत आहेत. विशेषत: विराट कोहली आणि युवा सॅम कॉन्स्टास यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी विराटनं कॉन्स्टन्सच्या खांद्याला धक्का दिला होता. यासाठी कोहलीला मॅच फीच्या 20 टक्के दंड आणि 1 डिमेरिट पॉइंटही देण्यात आला. मैदानावर जरी हे प्रकरण शांत झालं असलं, तरी ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये अजूनही वातावरण तापलेलं आहे.
ऑस्ट्रेलियन मीडिया आता विराट कोहलीवर टीका करताना मर्यादेपलीकडे गेला आहे. सिडनी टाइम्स मॅगझिननं सर्व मर्यादा ओलांडत विराटसाठी असा शब्द वापरला ज्याची कल्पनाही करता येणार नाही. सिडनी टाइम्सने सॅम कॉन्स्टासच्या छायाचित्रासह कॅप्शनमध्ये लिहिलं की, “विराट, मी तुझा बाप आहे”. यानंतर आता सिडनी टाइम्सवर चोहीकडून टीका होत आहे.
‘सिडनी टाइम्स’ हे तेच मासिक आहे, ज्यांनी विराट कोहली ऑस्ट्रेलियाला पोहोचला तेव्हा त्याला ‘किंग’ असं म्हटलं होतं. त्यावेळी टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव होत होता. मात्र सॅम कॉन्स्टन्ससोबत झालेल्या वादानंतर आता सिडनी टाइम्स विराटला सर्वात मोठा खलनायक म्हणत आहे. हे या मासिकाचं दुहेरी चरित्र दर्शवतं.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियन संघानं प्रथम फलंदाजी करत सामन्यात 474 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानं नितीश कुमार रेड्डीच्या शतकाच्या जोरावर 369 धावा केल्या. खेळाच्या चौथ्या दिवशी यजमान संघानं दुसऱ्या डावात 9 बाद 228 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत त्यांच्याकडे अजून 333 धावांची आघाडी आहे.
हेही वाचा –
टीम इंडियासाठी 300 पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य मोठं नाही, यापूर्वीही केले आहेत अनेक चमत्कार
‘मास्टरमाइंड’ कोहलीनं मिळवून दिली सिराजला विकेट, एक सल्ल्यानं सामन्याचं चित्र पालटलं!
“मी सिलेक्टर असतो तर रोहितला नारळ दिला असता”, दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य