जगभरात सध्या कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. त्यामुळे त्याचा परिणार अनेक क्रीडास्पर्धांवर झाला आहे. अनेक स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेवरही परिणाम होणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता.
पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख केविन रॉबर्ट्स यांनी हा विश्वचषक ठरलेल्या वेळेतच होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
Cricket.com.auने दिलेल्या वृत्तानुसार रॉबर्ट्स यांनी सांगितले की ‘आम्हाला पूर्ण आशा आहे की सर्व खेळ पुढील काही आठवड्यात किंवा काही महिन्यात पुन्हा सुरु होतील. साहजिकच आपल्यापैकी कोणीही तज्ञ नाही, पण आम्हाला आशा आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषक खेळला जाईल तेव्हा आपण सामान्य परिस्थितीत परत येऊ.’
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याच वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान महिला टी२० विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केले होते. पण त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियामधील सर्व क्रिकेट स्पर्धांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
ट्रेडिंग घडामोडी-
–आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
–कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत दौऱ्यावरुन परतल्यावर द. आफ्रिकेच्या खेळाडूंना देण्यात आला हा इशारा
-कोरोनापासून वाचण्यासाठी टीम दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांचे अजब उपाय
– पाकिस्तानचा एकही खेळाडू टीम इंडियात खेळण्याच्या नाही लायक
–तर विश्वचषकाची सेमीफायनलच ठरु शकते धोनीचा अंतिम सामना