प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात सुरुवात होणार आहे. यंदा या मालिकेत 5 सामने खेळले जातील. मात्र या मालिकेची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. आतापर्यंत दोन्ही देशांच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी या मालिकेबाबत आपापली मतं मांडली आहेत.
नुकतेच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाचं या मालिकेबाबतच वक्तव्य समोर आलं. त्याच्या या वक्तव्याकडे भारताला दिलेला इशारा म्हणून पाहिलं जातंय. यापूर्वी दोनवेळा बॉर्डर-गावस्कर मालिका घरच्या मैदानावर गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ बदला घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध त्यांच्या विजयाचा मार्ग अजिबात सोपा असणार नाही.
ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा यानं एक वक्तव्य केलं, ज्यात त्यानं भारतीय संघाला इशारा दिला आहे. त्यानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा संदर्भही दिला. ख्वाजा म्हणाला, “गेल्या दोन वर्षांपासून आम्ही कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल दोन स्थानांवर आहोत. आम्ही शेवटच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचलो आणि जिंकलो. दोन्ही संघांमध्ये खूप अटीतटीचे सामने खेळले गेलेत. या संघाचा एक भाग असणं हा सन्मान आहे. आयपीएल असूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये जबरदस्त स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियाला नेहमीच क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताला हरवणं आवडतं. निश्चितच, भारतासाठीही ही खूप महत्त्वाची बाब आहे.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 1996-97 मध्ये सुरू झाली. भारत या मालिकेत नेहमीच ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरलाय. टीम इंडियानं पहिली मालिका 1-0 अशी जिंकली होती. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 16 बॉर्डर-गावस्कर मालिका खेळल्या गेल्या, ज्यामध्ये भारतानं 10 वेळा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियानं गेल्या चार मालिका जिंकल्या आहेत.
हेही वाचा –
अजब क्रिकेटपटू! वडील एका देशासाठी खेळले, जन्म दुसऱ्या देशात झाला, कसोटी पदार्पण तिसऱ्याच देशासाठी!
बीसीसीआयनं ज्याला बाहेर केलं, त्यानं पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं! टीकाकारांना सडेतोड उत्तर
मोहम्मद शमी पत्नीला पोटगी म्हणून महिन्याला किती रुपये देतो? आकडा धक्कादायक!