अजिंक्य रहाणे त्याचे दर्जेदार शॉट्स आणि संयमी खेळीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियन संघाचा मध्यक्रमातील फलंदाज पीटर हँड्सकॉम्ब याच्यावर देखील अजिंक्य रहाणेचा चांगलाच प्रभाव आहे. 2016 साली हँड्सकॉम्ब भारत दौऱ्यावर असतानाच अजिंक्य रहाणेचा चांगलाच चाहता बनला होता. रहाणेकडे त्याने फलंदाजीचे काही सल्ले देखील मागितले होते.
पीटर हँड्सकॉम्ब (Peter Handscomb) याच्या मते अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) फिरकी गोलंदाजांविरुद्ध ज्या पद्धतीने खेळत होता, ते खूपच अप्रतिम होते. पीटर रहाणेची ही खेली पाहून हैराण झाला होता. आयपीएल 2016 साठी पीटर भारतात आला होता, तेव्हा रहाणेकडून त्याला फलंदाजीचे काही खास सल्लेही मिळाले. पीटरने सांगितल्यानुसार रहाणे त्याचा फ्रंट लेग क्लिअर करून मिड-विकेटच्या दिशेने शॉट खेळत होता. त्यामुळेच तो ओवर पिच चेंडूवर देखील धावा करत होता. ही गोष्ट खरोखर कौतुकास पात्र असल्याचेही पीटर वाटते.
पीटर हँड्सकॉम्बकडून अजिंक्य रहाणेच्या गुणवत्तेचे कौतुक
एका मुलाखतीत पीटर हँढ्सकॉम्बने अजिंक्य रहाणेचे कौतुक केले. तो म्हणाला, “तो हा शॉट बॅकफुटवर जाऊन मिडविकेटच्या दिशेने खेळत होता, जे खरोकर जबरदस्त होते. मी हे पाहून हैराण झालो आणि मलाही हे शिकण्याची गरज आहे, असे म्हटलो. आम्ही याविषयी चर्चा केली आणि तेव्हा समजले की, तो स्वतःचा फ्रँट लेग बाजूला करत होता आणि तेथून चेंडूवर प्रहार करत होता. त्यामुळे बॅकफुटवर जाऊन धावा करण्याची संधी तयार होत होती. जर चेंडू ओवरपिच असेल, तर तुम्ही फ्रँट फुटवर जाऊनही स्कोर करू शकता. यामुळे तुम्ही चांगल्या चेंडूवर डिफेंड देखील करू शकता.”
दरम्यान, पीटर हँड्सकॉम्ब सध्या ऑस्ट्रेलियन संघासाठी भारताविरुद्ध बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 132 धावांनी पराबव स्वीकारला. तर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात पीटरने 72, तर दुसऱ्या डावात एकही धाव करू शकला नाही. भारतीय खेळपट्टीवर त्याला स्वस्तात विकेट गमवावी लागल्याचे त्याने मान्य केले. (Australian player Peter Handscomb was impressed by Ajinkya Rahane in IPL 2016)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलवर जोरदार टीका होत असतानाच मिळाला विंडीजच्या दिग्गजांचा भक्कम पाठिंबा; म्हणाले, ‘एक हजार पटीने…’
‘बीसीसीआयने तुम्हाला समान मानधन दिले, तरीही तुम्ही…’, हरमनसेनेवर भडकल्या भारताच्या माजी कर्णधार